i was recording my own rape in mobile: ग्वाल्हेर हायकोर्टामध्ये (gwalior high court) बलात्कार प्रकरणाच्या (rape case) सुनावणीदरम्यान न्यायाधीशच गोंधळून गेल्याचा प्रकार घडला. आरोपीच्या जामीनाला विरोध करताना पीडित महिलेने मीच माझ्यावर बलात्कार होत असतानाच मोबाईलवरुन या घटनेचा व्हिडीओ शूट केल्याचा दावा केला आहे. यावर कोर्टाने आश्चर्य व्यक्त करताना असं कसं शक्य आहे असा प्रश्न विचारला. ज्या महिलेवर बलात्कार होतोय तिच त्याचं शुटींग कसं करु शकते? असा प्रश्न कोर्टाने विचारला. कोर्टाने शासकीय अधिवक्त्यांना यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. तपास अधिकाऱ्यांनी या व्हिडीओच्या सीडीसहीत उपस्थित रहावे. महिला दावा करत असलेला कथित व्हिडीओ कुठेही सेव्ह न करता पोलिसांच्या ताब्यात ठेवावा. सीडी पाहिल्यानंतरच खरोखरच ही घटना बलात्काराची आहे की स्वच्छेने ठेवलेले शरीरसंबंध आहेत याबद्दलचा निर्णय घेता येईल, असं कोर्टाने म्हटलं.


मीच शूट केला व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्वाल्हेर जिल्ह्यातील बिऔला पोलीस स्थानकामध्ये 16 डिसेंबर 2022 साली एका विवाहित महिलेने जितेंद्र बघेल विरोधात बालत्काराची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणामध्ये आता एफआयआर दाखल करण्यात आली आणि सुनावणी झाली असता या महिलेने घडलेला प्रकार कोर्टाला सांगितला. आपला जबाब नोंदवताना या महिलेने जितेंद्र माझ्यावर बलात्कार करत होता त्यावेळी मी माझ्या मोबाईलवर या घटनेचा व्हिडीओ शूट करत होते, असा दावा केला. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी विवाहितेचा जबाब कलम 164 अतंर्गत नोंदवून घेतला होता. हा जबाब नोंदवतानाही या महिलेने आपण स्वत: बलात्कार होतानाचा घटनाक्रम मोबाईलमध्ये शूट केला होता असं म्हटलं होतं. 


आरोपीच्या वकिलाचा मोठा दावा


या तक्रारीनंतर पोलिसांनी बिलौआ पोलिसांनी जितेंद्रला अटक केली. आरोपीने जामीन मिळवण्यासाठी डबरा कोर्टामध्ये अर्ज केला होता. मात्र पीडित महिलेने जामीनाला विरोध केल्याने जामीन नाकारण्यात आला. यानंतर जितेंद्रने ग्वाल्हेर हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. जितेंद्रच्यावतीने अधिवक्ता संगीता पचौरी यांनी आरोपीने आपली जमीन विकली होती. त्यानंतर या व्यक्तीने पीडित महिलेच्या पतीला ही जमीन राबवण्यासाठी दिली होती. जेव्हा जितेंद्रनं आपल्या हिश्याचे पैसे मागितले तेव्हा या महिलेने त्याच्याविरोधात बलात्काराच्या आरोपांमध्ये अडकवण्याची धकमी दिली. घटनेच्या 36 दिवसांनंतर महिलेने तक्रार दाखल केल्याच्या मुद्द्याकडेही पचौरी यांनी कोर्टाचं लक्ष वेधलं. पीडितेने कलम 164 अंतर्गत जबाब नोंदवला. यामध्ये पीडितेने स्वत: बलात्काराचा व्हिडीओ शूट केल्याचा दावा केला होता.


न्यायालयाने दिले निर्देश


दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आश्चर्य व्यक्त करताना ज्या महिलेवर बलात्कार होत आहे तिच या घटनेचं व्हिडीओ शूटींग कसं करु शकते असा प्रश्न उपस्थित केला. शासकीय अधिवक्त्यांनी हा कथित व्हिडीओ सेव्ह न करता पाहवा आणि त्यासंदर्भात कोर्टाला सविस्तर अहवाल द्यावा. हे संबंध संमतीने ठेवले आहेत की जबरदस्ती झाली आहे हे यानंतरच सांगता येईल असं कोर्टाने म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 फेब्रवारी रोजी आहे.