नवी दिल्ली : २०१९ साली भाजपसाठी प्रचार करण्याची ऑफर अरविंद केजरीवालांनी ठेवली आहे. २०१९ निवडणुकीआधी केंद्र सरकार दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार असेल तर मी स्वत: भाजपचा प्रचार करीन, असं केजरीवाल म्हणाले. दिल्ली विधानसभेमध्ये दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. हा प्रस्ताव विधानसभेत स्वीकार करण्यात आला. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा म्हणून आम आदमी पक्षानं दिल्लीत अभियान सुरू केलं आहे. याचाच भाग म्हणून आप दिल्लीमध्ये जागोजागी सभा घेत आहे.


याचबरोबर उप-राज्यपाल दिल्ली छोडो या आंदोलनाचीही आपनं सुरुवात केली आहे. उप-राज्यपाल दिल्ली सरकारच्या प्रत्येक कामात अडथळा आणत आहेत. उप-राज्यपाल जनहिताच्या कामाला मंजुरी देत नाहीत. दिल्लीच्या भल्यासाठी उप-राज्यपालांची गरज नसल्याचं अरविंद केजरीवाल म्हणाले.