नवी दिल्ली : दक्षिम भारतातील प्रसिद्ध स्वयंभू बाबा स्वामी नित्यानंद यांनी दावा केलाय की ते गाईंना तामिळ आणि संस्कृत बोलणं शिकवू शकतात. एका प्रवचना दरम्यान त्यांनी हा दावा केलाय. त्यांच्या प्रवचनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाय आणि माकडांना अध्यात्माच्या माध्यमातून आपण संस्कृत आणि तामिळ भाषा शिकवू शकतो, असा दावा नित्यानंद या व्हिडिओत करताना दिसत आहेत. आपण एक असं सॉफ्टवेअर तयार केलंय ज्याद्वारे हे संभव आहे. आपण या सॉफ्टवेअरची टेस्टिंगही केलीय., असंही त्यांनी म्हटलंय. 


'माकड आणि गाय यांसारख्या जनावरांच्या शरीरात मनुष्याच्या शरीराप्रमाणे भाग असतात. मी अध्यात्माच्या माध्यमातून जनावरांच्या शरीरात हे भाग निर्माण करण्यासाठी मी सक्षम आहे. मी ही गोष्ट वैज्ञानिक पद्धतीनंही सिद्ध करू शकतो' असं नित्यानंद म्हणताना या व्हिडिओत दिसत आहेत.


सॉफ्टवेअरच्या टेस्टिंगनंतर मी हे सांगू इच्छितो की मी गाय आणि माकडाच्या शरीरात हे भाग निर्माण करू शकतो. ही गोष्ट रेकॉर्डमध्ये राहू द्या, मी एका वर्षांच्या आता ही गोष्ट सिद्ध करेन. मी माकड, वाघ आणि सिंह यांना बोलण्यसाठी एक वोकल कॉर्ड (नळी) तयार करेन, असंही त्यांनी म्हटलंय.