नवी दिल्ली : पाकिस्तानचे कार्गो विमान राजस्थानातल्या जयपूरमध्ये उतरवण्यात आले आहे. भारतीय हवाई हद्दीत शिरलेल्या अँटोनोव्ह ए एन - १२ या पाकिस्तानी मालवाहू विमानाला भारतीय हवाई दलाने सक्तीने जयपूर विमानतळावर उतरायला भाग पाडले. जयपूरमध्ये पाकिस्तानचे हे कार्गो विमान उतरवल्यानंतर, त्या विमानाची कसून तपासणी करण्यात आली. सोबतच भारतीय हवाई दलाकडून या कार्गो विमानाच्या वैमानिकाची तसेच इतरांचीही सखोल चौकशी करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे विमान निर्धारित हवाईमार्गाऐवजी चुकीच्या मार्गाने का आणण्यात आले, याबाबत पायलटची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे विमान कच्छच्या वाळवंटात असलेल्या हवाईदलाच्या तळापासून ७० किलोमीटर अंतरावरून भारतीय हवाई हद्दीत दाखल झाले होते. या विमानाने निषिद्ध क्षेत्रात प्रवेश केल्याने त्यावर भारताकडून त्वरीत कारवाई करण्यात आली. 


याबाबत हवाईदलाचे प्रवक्ता ग्रुप कॅप्टन अनुपम बॅनर्जी यांनी सांगितले, दुपारी जॉर्जियाचं अँटोव्ह एएन-१२ हे मालवाहू विमान कराचीतून दिल्लीकडे येण्यासाठी निघाले. या उड्डाणास अधिकृत परवानगीही देण्यात आली होती. मात्र, उड्डाण घेतल्यानंतर मध्येच पायलटने मार्ग बदलला. उत्तर गुजरातमधील भारतीय हवाई हद्दीत हे विमान घुसले. या विमानाला वेळीच भारतीय एअर डिफेन्स सिस्टमने हेरले सक्तीने खाली उतलविले.



हे विमान रडारवर दिसताच दोन सुखोही-३० एमकेआय फायटर जेट धाडली आणि हे विमान रोखत जयपूर विमानतळावर उतरवण्यास भाग पाडले. त्यानंतर पाकिस्तानचे हे विमान खाली उतरले. आता चौकशी सुरु आहे.