नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याच्या युनिट मिग २१ बाइसन स्क्वॉड्रनला 'फाल्कन स्लेयर्स' आणि 'एम्राम डॉजर्स' या शीर्षकांसहीत पट्टा बहाल करत त्यांचा सन्मान करण्यात आलाय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ फेब्रुवारी रोजी हवाई हल्ल्यादरम्यान पाकिस्तानच्या एफ - १६ या लढावू विमानाला हाणून पाडण्याच्या कामगिरीमुळे या युनिटचं कौतुक करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वायुसेनेच्या ५१ स्क्वॉड्रनला देण्यात आलेल्या नव्या पट्ट्यांमध्ये एक मिग-२१ सोबत लाल रंगाचा एफ-१६ दर्शवण्यात आलंय. या पट्ट्यावर वरच्या बाजुला 'फाल्कन स्लेयर्स' तर खालच्या बाजुला 'एम्राम डॉजर्स' असं लिहिण्यात आलंय. 



भारताकडून पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये दहशतवादी प्रशिक्षण शिबिरावर हवाई हल्ला करण्यात आला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या अनेक लढावू विमानांनी जम्मू-काश्मीरमधल्या अनेक सैन्य शिबिरांना निशाण्यावर घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारतीय जवानांनी हादेखील प्रयत्न हाणून पाडला. याच संघर्षादरम्यान विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचं एफ-१६ लढावू विमान उद्ध्वस्त करत अदम्य साहस आणि दृढतेचा परिचय करून दिला होता. एफ-१६ पाडतानाच पाकिस्तानेची सीमा ओलांडलेल्या अभिनंदन यांना पाकिस्तान सेनेनं आपल्या ताब्यात घेतलं होतं. परंतु, त्यांना सोडण्यात आलं. वर्धमान हे दोन्ही देशांदरम्यान सैन्य ताकदीचा चेहरा बनले होते. भारतीय वायुसेनेकडून वर्धमान यांना वीरचक्र प्रदान करण्यात येण्याची शिफारस केली जातेय.