मुंबई : UPSC Success Story | केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC उत्तीर्ण होणे हे असे स्वप्न आहे की देशातील जवळपास प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी ते पाहतोच. काहीजण आई-वडिलांना अभिमान वाटावा म्हणून आयुष्यभर यूपीएससीच्या तयारीत गुंतलेले असतात तर काही समाज बदलण्याची स्वप्ने पाहत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी उमेदवारांना ना दिवस दिसतो ना रात्र, ना घरापासून शेकडो किलोमीटर दूर राहण्याचा संकोच!  या मेहनतीचे फळ त्यांना निकालानंतर मिळते. निष्ठेने परिश्रम करणारे उमेदवार परीक्षेत यशाची पताका उंचावतात. आज आम्ही अशीच एक यशोगाथा घेऊन आलो आहोत.


हरियाणाच्या अनु कुमारीला UPSC मध्ये उत्तुंग यश


हरियाणातील सोनीपत येथील अनु कुमारी यांनी 2017 मध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावला होता. तिची यशोगाथाही खूप रंजक आहे. अनुने दिल्लीच्या डीयू कॉलेजमधून भौतिकशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर तिने एमबीएचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईतील आयसीआयसीआयमध्ये नोकरीही स्वीकारली. 2012 मध्ये अनुने गुरुग्रामला येऊन लग्न केले.


आधी आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा निर्णय


अनुला शालेय-कॉलेजमधील मित्रांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याचा सल्ला दिला होता. परंतू अनुने प्रथम तिची आर्थिक परिस्थिती सुधारण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे आधी नोकरी करायची आणि मग नागरी सेवेची तयारी करायची. असे तिने ठरवले. यादरम्यान अनुच्या नातेवाइकांनीही तिला परीक्षेच्या तयारीसाठी प्रेरित करीत होते.


मुलापासून दूर राहण्याची तयारी


यूपीएससीच्या तयारीसाठी कठोर परिश्रम आणि त्याग दोन्ही आवश्यक आहे. याचे उदाहरण अनु कुमारीच्या यशोगाथेतही पाहायला मिळते. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी चांगली तयारी करण्यासाठी अनु जवळपास दोन वर्षांपासून तिच्या मुलापासून दूर होती. पहिल्याच प्रयत्नात ती अयशस्वी ठरला. मात्र, तिने हार न मानता पुन्हा तयारी केली आणि यशाचा झेंडा फडकवला. अनु कुमारीने सन 2017 मध्ये नागरी सेवा परीक्षेत देशात द्वितीय क्रमांक पटकावला होता.


स्पर्धा परिक्षेच्या उमेदवारांसाठी सल्ला


प्रसारमाध्यमांशी बोलताना अनु कुमारी म्हणते की, मेहनत आणि पूर्ण समर्पणानेच यश मिळवता येते. तयारीच्या वेळी समाजातील लोक विविध मार्गांनी तुमचा मनोधैर्य खचण्याचा प्रयत्न करतील. मात्र, तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. चांगली रणनीती बनवून आणि कठोर परिश्रम केल्याने तुमचे ध्येय साध्य होऊ शकते.