मुंबई : देशभरातील अनेक तरूण-तरूणी वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. मात्र असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे जात नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आयएएस लेव्हलच्या मुलाखतीत कसे प्रश्न विचारले जातात याची माहिती देणार आहोत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच लेव्हलची झाली पाहिजे. तसेच हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमच्या तर्कशक्तीची चाचणी घेण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे काही प्रश्न आम्ही खाली देत आहोत, ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.


'हे' आहेत मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न


प्रश्न: अशी कोणती गोष्ट आहे जिच्याशिवाय एखाद्याला ओळखता येत नाही?
उत्तर: नाव


प्रश्न: लहान वयातच पांढरे केस का होतात?
उत्तर: व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता


प्रश्न: पाणी ओले का आहे?
उत्तरः पाण्यात ऑक्सिजन असतो आणि ऑक्सिजनमध्ये आर्द्रता असते. या ओलाव्यामुळेच पाणी ओले होते. वास्तविक, पाणी ओले नसते, पाण्याबद्दल जो अनुभव येतो, त्याला आपण ओलेपणा म्हणतो.


प्रश्न: एखादी व्यक्ती घेऊ शकते पण परत कधीच देऊ शकत नाही असे काय आहे?
उत्तर: प्राण/जीव


प्रश्न: एखादी भाषा सरळ आणि उलट बोलली तरी तिचा समान अर्थ प्राप्त होतो?
उत्तर: मल्याळम


प्रश्न: सर्वात लहान देश कोणता आहे?
उत्तर: व्हॅटिकन सिटी.


प्रश्नः जितके जवळ जाल तितके कमी दिसतं असं काय आहे?
उत्तर: काळोख


प्रश्‍न: असे कोणते काम आहे जे माणूस मेल्यानंतरही करू शकतो?
उत्तर : अवयवदान