मुंबई : इंटरनेटवर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. त्यात डान्स, स्टंट आणि कॉमेडी व्हिडीओ देखील असतात, जे आपले मनोरंजन करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु हा डान्स व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओमध्ये नाचताना दिसणारा व्यक्ती सामान्य माणूस नसून आयएएस अधिकारी आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कोट आणि निळी पँट घातलेला दिसत आहे, तो व्यक्ती आयएएस अधिकारी असल्याचा दावा देखील केला जात आहे. या आयएस अधिकाऱ्याचे नाव गोपाल कृष्ण बी. आहे आणि ते महापालिकेचे आयुक्त आहेत.


व्हिडिओमध्ये IAS अधिकारी ब्रेक डान्स करताना दिसत आहेत. त्याच्या स्टेप्स आणि त्याची शैली लोकांना फारच आवडली आहे.


IAS अधिकारी  गोपाल कृष्ण बी यांच्या आजूबाजूला उभे असलेले लोकही टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देत आहेत. आयएएस अधिकाऱ्याचा ब्रेक डान्स कोणत्याही बॉलिवूड स्टारच्या डान्सपेक्षा कमी नाही.



आयएएस अधिकाऱ्याच्या डान्सचे कौतुक करताना एका यूजरने लिहिले की, ''असे काय झाले की तो आयएएस आहे. तुमच्याकडे प्रतिभा असेल तर तुम्ही ती दाखवली पाहिजे आणि त्याचा अभिमान बाळगला पाहिजे.''


त्याचवेळी आणखी एका युजरने आयएएस अधिकाऱ्याचे कौतुक करत लिहिले की, ''त्याने डान्स स्टेप्सचा खास सराव केला आहे असे दिसते. शेवटी आयुष्य मजेत असावे. चाला छान आहे सर.''