BCCIच्या अध्यक्ष, सेक्रेटरींना किती मिळतो पगार? आकडा ऐकूनच बसेल धक्का!

Jul 04, 2024, 15:55 PM IST
1/7

BCCIच्या अध्यक्ष, सेक्रेटरींना किती मिळतो पगार? आकडा ऐकूनच बसेल धक्का!

BCCI Members Salary jay Shah  Roger Binny India Cricket Marathi News

BCCI Members Salary: 17 वर्षांनंतर दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरणाऱ्या टीम इंडियावर बक्षिसांचा पाऊस पडतोय. या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयने टीम इंडियावर पैशांची बरसात केलीय. 

2/7

125 कोटी रुपयांचं बक्षीस

BCCI Members Salary jay Shah  Roger Binny India Cricket Marathi News

बीसीसीआयने टीम इंडियासाठी 50-60 कोटी नव्हे तर तब्बल 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. यानंतर साऱ्या जगाचे डोळे विस्फारले. 

3/7

किती पगार मिळत असेल?

BCCI Members Salary jay Shah  Roger Binny India Cricket Marathi News

अशा या बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी हे आहेत. तर जय शाह सचिव आहेत. टीम इंडियाच्या प्लेयर्सना करोडोची बक्षिसे देण्याचा निर्णय घेणाऱ्या बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना किती पगार मिळत असेल? कधी विचार केलाय? 

4/7

पगाराबाबत उत्सूकता

BCCI Members Salary jay Shah  Roger Binny India Cricket Marathi News

आयपीएल आणि त्यानंतर झालेल्या वर्ल्ड कपमध्ये जय शहा यांचे नाव खूप चर्चेत राहिले. त्यांच्या पगाराबाबतही अनेकांना उत्सुकता आहे.

5/7

वार्षिक 5 कोटी रुपये इतका पगार

BCCI Members Salary jay Shah  Roger Binny India Cricket Marathi News

बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना वार्षिक 5 कोटी रुपये इतका पगार मिळत असल्याची माहिती माध्यमांतून समोर आली आहे. माजी अध्यक्ष सौरव गांगुलीलाही हेच पे स्केल होतं असं सांगितलं जातं. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सेक्रेटरींसह इतर स्टाफलाही डोळे विस्फारतील इतकं वेतन मिळतं. 

6/7

दररोज भत्ता

BCCI Members Salary jay Shah  Roger Binny India Cricket Marathi News

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना मासिक पगार मिळत नसून त्यांना दररोज भत्ता मिळतो, असे सांगितले जाते. बोर्डाच्या सर्व सदस्यांना एका बैठकीसाठी दररोज 40 हजार रुपये इतका भत्ता दिला जातो. हा भत्ता आयपीएल अध्यक्षांनाही लागू होतो.

7/7

साडेतीन ते पाच कोटी रुपयांपर्यंत पगार

BCCI Members Salary jay Shah  Roger Binny India Cricket Marathi News

 परदेश दौऱ्यावर गेल्यास भत्ता वाढतो. यासोबतच प्रवासासाठी बिझनेस क्लासचे तिकीटही उपलब्ध केले जाते. असे असले तरी जय शहा यांच्या पगाराबाबक कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. तरी ते ज्या पदावर आहेत, त्याला पदालाही साडेतीन ते पाच कोटी रुपयांपर्यंत पगार मिळतो. दरम्यान जय शहा बीसीसीआयकडून पगार घेत नाहीत, असेही मीडिया रिपोर्ट्स सांगतात.