टी-20 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघासह पंतप्रधान मोदींच्या मनमोकळ्या गप्पा; ट्रॉफीसह केलं फोटोशूट, पाहा PHOTOS

टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आज 4 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या भारतीय संघाची भेट घेतली. टीम इंडिया या भेटीसाठी लोक कल्याण मार्ग येथे पोहोचले होते. पाहा या क्षणाचे खास फोटो. 

| Jul 04, 2024, 13:59 PM IST

भारतीय क्रिकेट टी 20 वर्ल्ड कप 2024 चा किताब जिंकून बारबाडोसवरुन मायदेशी परतले आहेत. भारतीय संघ गुरुवारी म्हणजे 4 जुलै रोजी सकाळी 6 वाजता दिल्लीच्या IGI एअरपोर्टवर पोहोचले. यानंतर टीम इंडिया दिल्लीच्या ITC मौर्य हॉटेलवर पोहोचले. यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. टी 20 चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतरची ही भेट खास होती. पाहा या भेटीचे खास फोटो. 

1/8

टी 20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीचे खास क्षण

2/8

भारतीय संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास क्षण. 

3/8

भारतीय संघाचे कोच राहुल द्रविड यांच्याशी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास गप्पा मारल्या. भारतीय संघाच्या यशाबाबत कौतुक केलं. 

4/8

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गप्पा मारताना टीम इंडिया. यावेळी संघाने आपल्या सामन्यातील आठवणींना उजाळा दिला. 

5/8

भारतीय संघ, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांच्या समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढला फोटो. 

6/8

टी 20 वर्ल्ड कपची ट्रॉफी जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाथी सोपवण्यात आली. 

7/8

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीदरम्यान हार्दिक पांड्याशी देखील गप्पा मारल्या. हार्दिक पांड्यावर गेल्या काही दिवसांपासून टीका होत होती. पण यावेळी रोहित शर्माने हार्दिक पांड्यावर दाखवलेला विश्वास महत्त्वाचा ठरला. 

8/8

टी 20 वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये जसप्रित बुमराहची देखील महत्त्वाची भूमिका होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्याशी मारल्या खास गप्पा.