दिसायला तर घोडा दिसतोय पण.. IAS अधिकाऱ्याच्या प्रश्नावर लोकांची उत्तरे पाहून माराल कपाळावर हात
हा नवीन ट्रेंड फॉलो केल्यामुळे सनदी अधिकाऱ्याला लोकांनी चांगलंच ट्रोल केले आहे. प्रश्न विचारुन जणू काही स्पर्धा चालू आहे अशी उत्तरे लोकही देत आहेत. पण ही `क्विझ` खेळून बक्षीस मिळणार नसले तर अनेक युजर्सचे मनोरंजन मात्र झाले आहे.
Viral News : सध्या देशभरातील सनदी अधिकारी (bureaucrats) हे सोशल मीडियावर (Socail Media) मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळतात. काही सनदी अधिकारी वन्यजीवांचे फोटो शेअर करत माहिती देत असतात. तर काही अधिकारी हे विविध उपक्रमांची माहिती देत असतात. मात्र काही अधिकारी हे एखादा फोटो टाकून तुम्ही याला काय म्हणता? अशा प्रकारे प्रश्न ट्विटरवर (twitter) लोकांना विचारत असतात. काही वेळा युजर्सकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो तर काही वेळा त्यावर मजेशीर उत्तरे दिली जातात. कधी कधी तर अधिकाऱ्यांना ट्रोलही केले जाते. असाच काहीसा प्रकार एका सनदी अधिकाऱ्यासोबत घडलाय.
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (IAS) आणि सिक्कीमचे कॅबिनेट सचिव जी. पी. उपाध्याय. यांनीही असाच काहीसा प्रश्न ट्विटर युजर्सना विचारला होता. पण लोकांनी दिलेली उत्तर पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. जी. पी. उपाध्याय यांनी आपल्या ट्विटरवर मैना पक्षाचा फोटो पोस्ट करत, हा कोणता पक्षी आहे ते सांगा, असे म्हटले. यावर लोकांची उत्तरे वाचून कदाचित जी. पी. उपाध्याय हे असा प्रश्न विचारण्याआधी विचार नक्कीच करतील अशी चर्चा आहे.
जी. पी. उपाध्याय यांच्या या ट्विटला उत्तर देताना अंशुमन झा या युजरने 'या प्रश्नाचे उत्तर फक्त आयएएस किंवा आयपीएसच देऊ शकतात, हे सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचे आहे,' असे म्हणत टोला लगावला.
सिद्धार्थ हिसारिया नावाच्या युजरने, 'आजकाल सर्व नोकरशहांना एवढंच काम उरले आहे. एक फोटो टाकून देतात आणि मग विचारत बसतात... हे काय आहे???, असे म्हटले आहे.
हा शहामृग आहे...
दिसायला तर हा घोडा दिसतोय पण...
हा मोर आहे आणि बर्फाच्या जंगलात पाण्याखाली राहतो..
हा नवीन ट्रेंड फॉलो केल्यामुळे सनदी अधिकाऱ्याला लोकांनी चांगलंच ट्रोल केले आहे. प्रश्न विचारुन जणू काही स्पर्धा चालू आहे अशी उत्तरे लोकही देत आहेत. पण ही 'क्विझ' खेळून बक्षीस मिळणार नसले तर अनेक युजर्सचे मनोरंजन मात्र झाले आहे.