IAS Shah Faesal defends Adani: अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार संस्था हिंडनबर्गचा (Hindenburg) अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांना मोठा फटका बसला आहे. हिडनबर्गचा अहवाल समोर आल्यापासून अदानी समूहाचे (Adani Group) शेअर्स सतत घसरत आहेत. यादरम्यान विरोधकांनी अदानी आणि केंद्र सरकारला (Central Government) धारेवर धरलं आहे. संसदेत अदानींच्या मुद्द्यावरुन जोरदार गदारोळ सुरु आहे. काँग्रेसने (Congress) केंद्र सरकावर अदानींना चुकीच्या पद्धतीने फायदा पोहोचवला असल्याचा आरोप केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यादरम्यान जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर 2019 मध्ये राजीनामा देणारे IAS अधिकारी शाह फैजल (shah faesal) पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांनी जाहीरपणे अदानींचं समर्थन केलं आहे. शाह फैजल यांनी अदानींच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर नेटकरी त्यावर कमेंट्स करत आहेत. 


अदानींचा सन्मान करतो - फैजल


IAS अधिकारी शाह फैजल यांनी लिहिलं आहे की "मी गौतम अदानींचा सन्मान करतो. कारण त्यांनी सर्वोत्तम होण्यासाठी प्रतिकूल परिस्थितींवर मात केली आहे. मी त्यांना एक महान व्यक्ती म्हणून ओळखो, जे समाजातील वैविध्यतेचा मनापासून सन्मान करतात, तसंत भारताला सर्वोच्च ठिकाणी पोहोचले पाहू इच्छितात. सध्या ते आणि त्यांचं कुटुंब अग्नीपरिक्षेचा सामना करत असून मी त्यांना शुभेच्छा देतो".



IAS परीक्षेत केलं होतं टॉप


शाह फैजल 2010 मध्ये चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी IAS परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवला होता. शाह मूळचे जम्मू काश्मीरचे आहेत. 2019 मध्ये त्यांनी राजीनामा देत आपला पक्ष स्थापन केला होता. 2019 मध्ये देशातील वाढत्या असहिष्णुतेचा दाखला देत त्यांनी राजीनामा दिला होता. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतरही शाह फैजल चर्चेत आले होते. 


पण काही महिन्यातच त्यांना राजकारणाचा कंटाळा आला. ते पुन्हा एकदा प्रशासकीय सेवेत सहभागी झाले आहेत. सध्या केंद्रीय पर्यटन विभागात उप-सचिव पदावर ते तैनात आहेत. शाह फैजल यांचा राजीनामा स्वीकारण्यातच आला नव्हता. 2020 मध्ये सार्वजनिक सुरक्षेच्या अंतर्गत त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. 


केंद्र सरकारचं केलं होतं कौतुक


गतवर्षी ट्विटरला 'मुस्लीम पीएम' ट्रेंड होत होता. त्यावेळी शाह फैजल यांनी एकामागोमाग अनेक ट्वीट केले होते. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं की "काश्मीरचा एक तरुण UPSC परीक्षेत अव्वल येतो, सरकारविरोधात जाऊ शकतो, तेच सरकार नंतर त्याला वाचवतं आणि आपलं करतं हे फक्त भारतातच शक्य आहे".