मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आज 12वी आणि 10वीचा निकाल जाहीर केला. या निकालानंतर देशभरातून तरूण-तरूणींच्या घवघवीत यशाच्या बातम्या समोर येत आहेत. त्यात एका IAS अधिकाऱ्याच्या मुलीने घरावर ईडीची रेड पडून सुद्धा CBSE बोर्डाच्या परीक्षेत 97.6 टक्के मिळवल्याचे वृत्त समोर येत आहेत. घरावर कोसळलेल्या इतक्या मोठ्या संकटानंतरही तिने मिळवलेल्या यशाची खुप चर्चा रंगतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IAS पूजा सिंघल यांना मनरेगा घोटाळ्याप्रकरणी निलंबित करत त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले होते. विशेष म्हणजे ज्यावेळेस पूजा सिंघल यांच्या घरावर ईडीची रेड पडली होती. त्याचवेळी पूजा सिंघल यांची मुलगी आयुषी पुरवार CBSE बोर्डाची 12 वीची परिक्षा देत होती. या दरम्यान तिची चौकशी देखील होत होती. त्यामुळे घरावर आलेल्या या संकटाचा आपल्या परीक्षेवर ताण येऊ न देता तिने परीक्षा पास केली आहे.  


 कुटुंबावर कोसळलेल्या संकटातही पूजा सिंघलची मुलगी आयुषी पुरवार हिने यंदा बोर्डाची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली आहे. आयुषीला बारावीत ९७.६ टक्के गुण मिळाले आहेत. आयुषीने इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात ९६ टक्के गुण मिळाले आहेत. त्यामुळे इतक्या कठीण प्रसंगात तिने मिळवलेल्या या यशाची चर्चा सुरु आहे.  


आयुषीने सांगितले की, ईडीच्या अधिकाऱ्यांनी परीक्षेदरम्यान तिला कधीही त्रास दिला नाही. परीक्षेच्या तयारीसाठी तिला स्वतंत्र खोली देण्यात आली होती. परीक्षेच्या तयारीच्या वेळी एकही अधिकारी त्या कक्षात येत नव्हता,असेही तिने सांगितले. आईच्या पावलावर पाऊल ठेवून तिला आयएएस अधिकारी व्हायचे आहे, असे तिने सांगितले.