मुंबई : युपीएससीची नागरी सेवा परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. यामाध्यमातून देशाच्या नागरी सेवांसाठी सनदी अधिकाऱ्यांची निवड केली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांना कठीण परीश्रम आणि अभ्यास करावा लागतो. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी पराकोटीची जिद्द आणि अभ्यास असावा लागतो. ही परीक्षा उत्तीर्ण करणारे अनेकजण समाजातील इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरतात. अशीच एक आएएस अधिकारी म्हणजे आर्तिका शुक्ला होय. ती 2015 साली नागरी सेवा उत्तीर्ण झाली होती. आर्तिकाने आपल्या पहिल्याच प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण करण्याचा मान पटकावला. तसेच आर्तिकाने 2015 वर्षी देशात 4 क्रमांक पटाकवला होता. जाणून घेऊ या आर्तिका बद्दल...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्तिका शुक्ला ही वाराणसीची रहिवासी आहे. त्याचे वडील डॉक्टर आहेत तर आई गृहिणी आहे. अर्तिकाला दोन मोठे भाऊ असून दोघांनीही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. अर्तिकाचे प्राथमिक शिक्षण सेंट जॉन स्कूलमधून झाले. ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती असे पालक सांगतात.


शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली. तिने MD करायला सुरुवात केली पण नंतर मोठ्या भावाच्या सांगण्यावरून तिने नागरी सेवा क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आर्तिकाने एमडी थांबवून नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.


अर्तिकाने 2014 पासून यूपीएससी नागरी सेवेची तयारी सुरू केली.  पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा तिने एकदाच अभ्यास केला. त्यानंतर त्याची सतत उजळणी केली. दरम्यान तिने कोणताही क्लास लावलेला नव्हता. आर्तिकाचे भाऊ तिला अभ्यासात मार्गदर्शन करीत होते. 


आर्तिका म्हणते की, नीट अभ्यास केल्यास ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एक वर्ष पुरेसा आहे. काटेकोर नियोजन आणि योग्य रणनीतीमुळे, अर्तिकाने 2015 मध्ये नागरी सेवा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली. एवढेच नाही तर ती देशात चौथी आली.


आतापर्यंत झालेल्या परीक्षांमधील प्रश्नांचा निट अभ्यास केल्यास, त्यानुसार आपल्या तयारीचे नियोजन केल्यास पूर्व परीक्षा सहज उत्तीर्ण होता येते. परंतु मुख्य परीक्षेसाठी चांगली तयारी केली पाहिजे.


यासाठी फक्त तोच विषय ऐच्छिक निवडा ज्यावर तुमची चांगली पकड आहे. तसेच चालू घडामोडींसाठी दररोज वर्तमानपत्र वाचा. तसेच, अनेक पुस्तकांऐवजी, मर्यादित पुस्तकांचा अभ्यास करा, परंतु नियमितपणे उजळणी करा. असेही आर्तिका सुचवते.


UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, मुलाखतीची चांगली तयारी करा. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास असणे. मुलाखतीची तयारी करण्यासाठी तुम्ही मॉक टेस्टमध्येही सहभागी होऊ शकता.


याशिवाय टॉपर्सच्या मुलाखतीही पाहता येतील. परंतू हे करताना कोणाचेही आंधळेपणाने अनुसरण करण्याऐवजी, आपल्या क्षमतेनुसार गोष्टींचा अवलंब करा.