मुंबई : देशातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या आयएएस अधिकारी अशी टीना डाबी यांची ओळख आहे. या ना त्या कारणाने त्या नेहमीच चर्चेत असतात.सोशल मीडियावर त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. दरम्यान या चाहत्या वर्गाला टीना दाबी यांचे निकनेम, हॉबी, आणि आवडते चित्रपट माहितीय का? नाही ना मग ही बातमी वाचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीना डाबी 2016 च्या बॅचच्या राजस्थान केडरच्या IAS अधिकारी आहेत. टीना लहाणपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिला बारावीत 96.25 टक्के गुण मिळाले होते. टीनाचे शालेय शिक्षण कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी स्कूल, नवी दिल्ली येथून झाले. तेथे असताना तिने लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमन, नवी दिल्ली येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. टीनाने बॅचलर ऑफ आर्ट्स इन पॉलिटिकल सायन्समध्ये पदवी घेतली आहे. टीनाने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती. ती उत्तीर्ण झाली होतीच पण ती तिच्या बॅचची टॉपर देखील होती. तिची निवड झाली यावर तिला विश्वासच बसत नव्हता. 


टीना दाबीचे टोपण नाव 'टीना' आहे. दुसरीकडे टीनाला वाचायला, पेटींग करायला, प्रवास करायला आणि संगीत ऐकायला आवडते. टीनाला बॉलिवूड चित्रपटांमधून अंदाज अपना अपना, 3 इडियट्स, आफ्टर ब्रेक, 2 स्टेट्स, कल हो ना हो, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हे चित्रपट आवडतात. तर हॉलिवूड चित्रपटांमध्ये टायटनिंग, पीएसआय लव्ह यू, स्लमडॉग मिलेनियर चित्रपट आ समावेश आहे.


दरम्यान नुकतीच टीना डाबीची पदोन्नतीही झाली असून त्यांना आता जिल्हाधिकारी करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी म्हणून त्यांची ही पहिली पोस्टिंग आहे. टीना सध्या राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात आपली सेवा देत आहे.