IAS Tina Tabi ने पतीसोबत सेलिब्रेट केलं New Year, पाहा त्यांचे लेटेस्ट फोटोज
IAS Tina Tabi: सध्या नवं वर्ष सुरू झाले असून आपले आवडते सेलिब्रेटीही न्यू इयर इव्हमध्ये बिझी झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्याचसोबतच सेलिब्रेटी इन्टाग्रामवरही (celebrity new year wishes) आपले न्यू इयरचे फोटो शेअर करत असतात आणि आपल्या चाहत्यांनाही अपडेट करत असतात.
IAS Tina Tabi: सध्या नवं वर्ष सुरू झाले असून आपले आवडते सेलिब्रेटीही न्यू इयर इव्हमध्ये बिझी झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्याचसोबतच सेलिब्रेटी इन्टाग्रामवरही (celebrity new year wishes) आपले न्यू इयरचे फोटो शेअर करत असतात आणि आपल्या चाहत्यांनाही अपडेट करत असतात. सध्या अशाच एका लोकप्रिय व्यक्तीनं आपले काही न्यू ईयर फोटोज शेअर केले आहेत. ही व्यक्ती आहे आयएएस टीना दाबी. टीना दाबी आणि रिया दाबी हिनं तिच्या इस्टाग्रामवरून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं आपले पती प्रदीप गावंडे (IAS Tina Dabi with Pradeep) यांच्यासोबतचे आपले फॅमिली फोटोज शेअर केले आहेत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना तिनंही एक खास पोस्ट शेअर केले आहे. आयएएस टीना दाबी ही देशातील सर्वात लोकप्रिय आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. तिने 2022 मध्ये आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांच्याशी दुसरे लग्न केले. (ias tina dabi shares new year wishes with hunband pradeep jawande photos goes viral)
टीना दाबीने 2015 मध्ये यूपीएससीमध्ये टॉप केल्यानंतर मसुरी येथील एलबीएसएनएए येथून प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणादरम्यान टीनाचीही चर्चा झाली. त्यांना 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया गोल्ड मेडल' प्रदान करण्यात आले. प्रशिक्षणानंतर त्या 2016 मध्ये राजस्थान केडरची IAS अधिकारी झाल्या.
टीनाच्या सौंदर्याच्या चर्चा
टीनाच्या हूशारीबरोबरच तिच्या सौंदर्याच्याही चर्चा होताना दिसतात. त्यामुळे सगळेच तिच्या सौंदर्याचं अनेकदा कौतुक करताना दिसतात. त्यामुळे तिच्या फोटोजनाही खूप लाईक्स आणि शेअर्स मिळतात. टीना ही अनेकदा चर्चेत असते. त्यामुळे इंटरनेटवर तिचीही हवा असते.
टीनाची बहीणही आहे तेवढीच हुशार
राजस्थानच्या गेहलोत सरकारने रिया दाबीला अलवरमध्ये सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. रिया दाबीने जिझस अँड मेरी स्कूल दिल्लीतून शिक्षण घेतले आहे. 12 वीनंतर तिने दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. रियाने राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास केला होता. रियाला UPSC मध्ये 15 वा क्रमांक मिळाला आहे.
कोण आहे आयएएस टीना दाबी ?
केवळ वयाच्या 22 व्या वर्षी टीना यांनी आयएएस पदवी संपादन केली आहे. IAS टीना दाबी यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1993 रोजी भोपाळ मध्य प्रदेश येथे झाला. त्या सध्या राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्याच्या कलेक्टर आहेत. त्यांनी दिल्लीतून शिक्षण घेतले. 2015 च्या UPSC परीक्षेत त्या टॉपर होती. तेव्हाापासून त्या सोशल मीडिया खूप चर्चेत आहेत.