ICICI Bank Credit Card:  तुमच्याकडे आयसीआयसीआयचं क्रेडिट कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण तुम्हाला बँकेला अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे. आयसीआयसीआय (ICICI) बँकेकडून काही दिवसांपूर्वी ग्राहकांना एक एसएमएस पाठवण्यात आला आहे. यात 20 ऑक्टोबर 2022 पासून क्रेडिट कार्डधारकांना ऑनलाइन रेंट पेमेंटसाठी (Online Rent Payment) 1 टक्के शुल्क भरावा लागेल, असं सांगण्यात आलं आहे. या मेसेजमध्ये 'Dear Customer, Starting 20-Oct-22, all transactions on your ICICI Bank Credit Card towards rent payment will be charged a 1% fee.' असं लिहिण्यात आलं आहे. आयसीआयसीआयने घेतलेल्या या निर्णयाचा परिणाम त्या भाडेकरूंवर होणार आहे. अनेकजण ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे घरभाडे भरतात. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. जेणेकरून ग्राहकांना त्याची तयारी करता येईल.


20 ऑक्टोबर 2022 पासून नवा नियम लागू होणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाड्यासाठी 1%  चार्ज आकारणारी आयसीआयसीआय पहिली बँक आहे. या बदलानंतर तुम्हाला घरभाडे क्रेडिट कार्डद्वारे भरायचे आहे की अन्य कोणत्याही मार्गाने हे ठरवावे लागेल. हा नियम बँकेकडून 20 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. म्हणजेच पूर्ण महिन्यानंतर तुम्हाला 1 टक्के अतिरिक्त रक्कम द्यावी लागेल. 


हा नियम कोणाला लागू होणार


हा नियम पेटीएम, क्रेड, मायगेट, रेडजिराफ किंवा मॅजिक ब्रिक्स यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे भाडे भरणाऱ्या लोकांसाठी आहे. आयसीआयसीआय बँकेच्या वतीने हा नियम लागू केल्यानंतर इतर बँकाही असा नियम लवकरच आणतील अशी शक्यता आहे.