कोरोनाचा उपचार करतेवेळी `हे` औषध प्रभावी
पाहा कोणी दिला हा सल्ला....
नवी दिल्ली : कोरोना Corona व्हायरसचं वाढतं संक्रमण पाहता आता वैद्यकिय क्षेत्रामध्येसुद्धा या व्हायरसशी लढण्यासाठी आणि त्यावर परिणामकारक सल शोधण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे.
संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या या कोरोनामुळे आता तणावाची परिस्थिती वाढत असतानाच इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरकडून अत्यंत महत्त्वाची बाब मांडण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या उपचारांदरम्यान बऱ्याच अंशी गंभीर असणाऱ्या प्रकरणांमध्ये hydroxycholoroquine हायड्रोक्सिक्लोरोक्वीन या औषधाचा वापर केला जाऊ शकतो असा सल्ला त्यांनी दिला आहे.
सहसा मलेरियाच्या रुग्णांसाठी या औषधाचा वापर केला जातो. बरं, आता हे औषध कोणाला देण्यात यावं याविषयीही एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे. ज्यानुसार कोरोनाग्रस्त किंवा संशयितांच्या संपर्कात येणारे आरोग्य विभागात काम करणआरे कर्मचारी, आरोग्य सेवक यांना हे औषध दिलं जाऊ शकतं असं आयसीएमआरकडून सांगण्यात आलं आहे.
आरोग्यसेवकांशिवाय कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना हे औषध दिलं जाण्यासंबंधीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या उपचारांमध्ये hydroxycholoroquine हे सिद्ध झाल्यामुळेच हा स्लला देण्यात आला आहे.
आयसीएमआरकडून देण्यात आलेला सल्ला आणि सध्याची भयावह परिस्थिती पाहता हा एक आशेचा किरणच म्हणावं लागणार आहे. त्यामुळे आता येत्या काळात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाच्या एकंदर उपाययोजना कितपत यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.