नवी दिल्ली : धर्माच्या नावाखाली तरुणांची माथी भडकवणारा झाकीर नाईक मलेशियामध्ये बसला आहे. मात्र तिथूनही त्याच्या कारवाया सुरूच आहेत. आता त्यानं देवदेवताच नव्हे, तर कोणत्याच मूर्ती किंवा पुतळे इस्लामला मान्य नसल्याचा विखारी प्रचार सुरू केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिरेकी कारवायांना अर्थपुरवठा केल्याचा आरोप झाल्यानंतर झाकीर नाईक मलेशियात पळून गेलाय. मात्र तिथून त्याचा विखारी प्रचार सुरूच आहे. आता मंदिरं आणि मूर्तींवर त्यानं टीका केलीये. मुस्लिम राष्ट्रांनी आपल्या देशात मूर्ती आणि पुतळ्यांना स्थान देऊ नये, ते तोडून टाकावेत असं त्याचं म्हणणं आहे. 


केवळ देवीदेवताच नव्हे, तर पशुपक्षी, कीडामुंगी यांचे पुतळेही इस्लाममध्ये निषिद्ध असल्याचा शोध नाईक याने लावला आहे. विशेष म्हणजे आपल्या विधानांचं समर्थन करण्यासाठी तो प्रेषित मोहम्मद पैगंबरांची उदाहरणं देत आहे.


धर्मप्रचाराच्या नावाखाली तोडफोड अन् विध्वंसाची भाषा करणाऱ्यांना गांभिर्यानं घेण्याची गरज नाही. मुस्लीम तरुणांची माथी भडकवण्याचा हा उद्योग थांबवायला हवा.