जयपूर: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. प्रचाराच्या या रणधुमाळीत भाजपकडून पुन्हा एकदा हिंदुत्वाचा हुकमी मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान सरकारमधील मंत्री धन सिंह यांनी काही दिवसांपूर्वी बांसवाडा मतदारसंघातील प्रचारसभेत केलेल्या एका वक्तव्यामुळे या चर्चेला सुरुवात झाली आहे. या प्रचारसभेत धन सिंह यांनी थेट हिंदू-मुस्लिम असा भेद करत मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला. 


राजस्थानमधील सर्व हिंदूंनी एकजूट होऊन भाजपच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. सर्व मुस्लीम काँग्रेसच्या बाजूने मतदान करत असतील तर हिंदूंनी एकजूट करून भाजपच्या बाजूने मतदान केले पाहिजे. जेणेकरून भाजप प्रचंड बहुमताने विजयी होऊ शकेल, असे धन सिंह यांनी म्हटले. 


भाजपकडून उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीतही हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटण्यात आला होता. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह प्रमुख नेत्यांनी हिंदुत्वाच्या मुद्दयावर मतदारांना भावनिक साद घातली होती. भाजपची ही चाल चांगलीच यशस्वीही ठरली होती. त्यामुळे आता भाजपकडून राजस्थानमध्येही हाच कित्ता भाजपकडून गिरवला जाण्याची शक्यता आहे. 


राजस्थानमध्ये येत्या ७ डिसेंबरला मतदान होत असून ११ डिसेंबरला निकाल जाहीर होईल.