तुमच्याकडची 5 रुपयांची नोट बनवेल मालामाल, घर बसल्या कमवा हजारो रुपये
हजारो रुपयांसाठी फॉलो करा महत्वाच्या स्टेप्स
मुंबई : तुम्हाला घर बसल्या मालामाल व्हायचंय तर अगदी सुवर्णसंधी आहे. काही शे नाहीत तर तुम्ही घर बसल्या 30 ते 35 हजार रुपयांपर्यंत कमाई करू शकतात. याकरता तुम्हाला कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. याकरता तुमच्याकडे फक्त 5 रुपयांची नोट असणं आवश्यक आहे. यावरून तुम्हाला 30 ते 35 हजार रुपये मिळू शकतात.
काय खास आहे या नोटमध्ये?
पाच रुपयांच्या नोटचं वेगळेपण आपण या बातमीतून जाणून घेणार आहे. या 5 रुपयांच्या नोटला विकून तुम्ही हजारो रुपये कमी शकता. या नोटचं वेगळेपण असं आहे की, या नोटवर 786 लिहिलेलं असणं आवश्यक आहे. तसेच या नोटवर ट्रॅक्टर व्हॅल्यू असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे अशापद्धतीची नोट असेल तर 30 हजार रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.
नियमांनुसार करा नोटेचे विक्री
भारतीय रिझर्व बँक (RBI) यांच्याकडून ही नोट 'एक्सट्रिमली रेयर' (Extremely Rare Notes India) असते. त्यामुळे ही नोट जर तुमच्याकडे असेल. तर तुम्ही खूप लक्की असाल. या नोटीच्या बदल्यात तुम्ही हजारो रुपये कमवू शकता. अशा अनेक वेबसाइट आहेत. जिथे तुम्ही जुन्या नोटा आणि नाणं खरेदी किंवा विक्री करू शकतात. दिलेल्या नियमानुसार तुम्ही जबरदस्त खरेदी किंवा विक्री करू शकता.
कुठे करू शकता याची विक्री
अशा खास नोटा अथवा नाणं शोधणं मुश्किल आहे. जर तुम्हाला असे 5 ट्रॅक्टरवाले नोट मिळाले असतील तर त्याच्या बदल्यात तुम्ही 30 हजार रुपयांहून अधिक रुपये कमवू शकतात. याकरता शॉपक्लूज आणि मरूधर आर्ट्सवर आपल्या जुन्या नोटा विकून भरघोस पैसे कमवू शकता. याकरता coinbazzar.com या वेबसाइटवर नोटांच्या बदल्यात अनेक पैसे मिळतील. या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्हाला जुन्या नोटांच्या बदल्यात चांगले पैसे मिळतील.
विक्रेता म्हणूनही कमवू शकता हजारो रुपये
या वेबसाइटवर तुम्ही जुन्या नोटांचे फोटो टाकू शकता. याकरता या संकेतस्थळावर जावं लागेल. सेलर म्हणून स्वतःला रजिस्टर करा. यानंतर नोटेचा फोटो ऑनलाइन अपलोड करा. तुमच्या नोटीकरता उत्सुक असलेले लोक तुम्हाला संपर्क करतील. त्यानंतर तुम्ही त्यांना आपला दर सांगू शकता.