मुंबई : लोकल ट्रेनमधून आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी प्रवास केला असावा. ट्रेनमधून प्रवास करताना प्रत्येकाला असे वाटते की आपल्याला खिडकीवाली सिट मिळावी. तर सिट न मिळालेल्या प्रवासांना वाटते की, त्यांना कोणतीही का होईना पण बसायला सीट मिळवी. ही मानवी वृत्ती आहे ज्यामध्ये लोकंच्या अपेक्षा नेहमीच वाढत असतात. ट्रेनमध्ये तुम्ही बऱ्याचदा लोकांना भांडताना पाहिले असेल. कधी खिडकीसाठी तर कधी काही वेगळ्या गोष्टीसाठी लोकं भांडत असतात. ट्रेनने प्रवास करताना काही लोकांना थंड हवेसह ट्रेनच्या बाहेरचे दृश्य पाहणे आवडते. तर काही लोकांना आपली झोप पूर्ण करायची असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेनच्या सिटवर खिडकी सोडून इतर ठिकाणी झोपणे फार कष्टाचे ठरते. परंतु बऱ्याच लोकांना आपली झोप आवरत नाही तेव्हा त्यांनी विना खिडकीच झोपावं लागलं, काही लोकं असं झोपतात देखील. आपण झोपलो की आपलं शरीर लूज पडतं, ज्यामुळे आपलं आपल्या शरीरावरती कंट्रेल राहत नाही. आम्ही हे तुम्हाला यासाठी सांगतोय कारण अशी घटना एका व्यक्तीसोबत ट्रेनमध्ये घडली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे.


या व्हिडीओमध्ये तुम्हा पाहू शकता की, एक व्यक्ती ट्रेनच्या सिटवरती गाढ झोपली आहे. ही व्यक्ती इतकी गाढ झोपेत आहे की, तिचं स्वत:वरती नियंत्रण नाही. ज्यामुळे पुढच्याच क्षणी त्याव्यक्तीसोबत एक घटना घडते जी फारच हस्यास्पद आहे.


या व्हिडीमधील या माणसाचा त्याच्या डाव्याबाजूला तोल जातो आणि तो सिटवरुन खाली पडतो. त्यानंतर त्याची झोप उडते. मात्र तो कुठे आहे काय करतोय? हे त्याला सुचत नाही. त्याच्यासोबत जे घडलं हे पाहून आजूबाजूचे लोकही काही वेळासाठी घाबरले आणि त्या व्यक्तीसोबत काय घडलं हे त्यांना देखील समजलं नाही.


हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर sayyyam_pi नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ६ डिसेंबर रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओचा लोक आनंद घेत आहेत. लोकांना हा व्हिडिओ किती आवडला आहे, याचा अंदाज त्याला मिळालेल्या लाईक्स वरुनच लावता येईल. इतक्या कमीवेळात त्याला लाखोहून अधीक लाईक्स मिळाले आहेत आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, 'भावांनो, नीट बघा, जे कुठेही झोपतात त्यांच्यासोबत असं होऊ शकते.' त्याचवेळी आणखी एका यूजरने त्याच्या मित्राला टॅग करत लिहिले, 'पाहा, कोणीतरी तुझ्यासारखेच झोपत आहे. तर आणखी एका युजरने त्याच्या मित्राला कमेंट सेक्शनमध्ये टॅग केले आणि त्याला सल्ला दिला, 'पुढच्या वेळी झोपण्यापूर्वी हा व्हिडीओ लक्षात ठेव.' एकूणच, हा व्हिडिओ सोशल मीडियावरती फारच धुमाकूळ घालत आहे. प्रत्येकजण त्यांच्या कमेंटमध्ये कोणालातरी टॅग करून हा व्हिडीओ पाहण्यासाठी आमंत्रित करत आहे.