मुंबई : असे म्हणतात की, पैशाची किंमत कधीही संपत नाही, मग पैसे कितीही जुने झाले तरी त्याचं महत्व तितकच आहे. तुमच्याकडे पडलेली नाणी किंवा नोटा त्यांच्या मूल्यापेक्षा अधिक मौल्यवान होतील, याबद्दल कोणी कधी विचार पण केला नसावा. पण आता हे शक्य आहे. कारण सध्या बाजारात जुन्या नाण्यांची मागणी वाढत आहे. ज्यामुळे त्याचे भावही गगनाला भिडत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला माहित आहे तुम्ही एक रुपयाच्या नाण्यातून लाखो रुपये कमवू शकता. एक रुपयाचे हे नाणं तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणत्याही अडचणींशिवाय लक्षाधीश बनू शकता.


एका रुपयाच्या नाण्यापासून तुम्ही 9 लाख रुपये कमवू शकता. पण हे नाणे वर्ष 1918 चे असावे. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी, जॉर्ज पंचमचा फोटो असणारा हा एका रुपया असावा तर त्याचे तुम्हाला 9 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते.


हे एक रुपयाचे नाणे ई-कॉमर्स साइट क्विकर (www.quickr.com) वर विकले जात आहे. मात्र, त्यासाठी कोणतीही निश्चित किंमत नाही. विक्रेते आणि खरेदीदार त्यांच्या स्वत: च्या सौदे दराने खरेदी आणि विक्री करू शकतात. पण त्याची किंमत 9 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या नाण्यांना खूप मागणी आहे. यामुळे, खरेदीदार ते क्विकरवर खरेदी करण्यास तयार आहेत. जर 1918 चे एक रुपयाचे नाणे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घरी बसून पैसे कमाऊ शकतात.


अजून बरीच नाणी विकली जात आहेत
आपल्याला हे माहित आहे की, जुन्या गोष्टी दुर्मिळ होतात.ज्यामुळे त्यांची किंमत वाढते. नाण्यांच्या बाबतीत देखील हेच दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत खूप जास्त झाली आहे. त्यामुळे 25 पैशांच्या नाण्यांपासून 2 रुपयांपर्यंत आणि जुन्या नोटाही त्याच्या खऱ्या मुल्यापेक्षा जास्त किंमतीत विकल्या जात आहेत.


नाणी कशी विकावी


जर तुमच्याकडे अशी दुर्मिळ नाणी असतील, तर तुम्ही ती ऑनलाईन वेबसाइटवर सहज विकू शकता. यासाठी तुम्हाला तिथे नोंदणी करावी लागेल. यानंतर, दोन्ही बाजूंच्या नाण्याच्या फोटो क्लिक करा आणि ते फोटो साईटवर अपलोड करा. खरेदीदार तुमच्याशी स्वतः संपर्क साधतील आणि तुम्ही परस्पर संमतीने उच्च किमतीत नाणी विकू शकता.


(ही बातमी विविध स्त्रोतांकडून गोळा केलेल्या माहितीवर आधारित आहे. 24taas.com कोणत्याही प्रकारे याची पुष्टी करत नाही.)