मुंबई : बरेच असे काही नियम आहेत जे 1 जुलैपासून बदलत आहेत, त्यात आणखी एक मोठा बदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर सिंडिकेट बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण सिंडिकेट बँकेचे आयएफएससी कोड १ जुलैपासून बदलणार आहे. अशा परिस्थितीत सिंडिकेट बँक आयएफएससी कोड केवळ 30 जून 2021 पर्यंत कार्य करेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 एप्रिल 2020 पासून सिंडिकेट बँक ही कॅनरा बँकेमध्ये विलीन झाली आहे. त्यामुळे १ जुलैपासून या बँकेचा आयएफएससी कोडही बदण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचे नवीन आयएफएससी कोड 1 जुलै 2021 पासून लागू केले जातील. ग्राहकांनी हे लक्षात घ्यावे की, तुमचे जर सिंडिकेट बँकेत खाते असेल तर, तुम्हाला 1 जुलैपासून व्यवहार करण्यासाठी  बँकेच्या शाखेकडून नवीन आयएफएससी कोड घेतला पाहिजे.


कॅनरा बँकेकडून अलर्ट जारी


सिंडिकेट बँकेबरोबरच कॅनरा बँकेनेही ग्राहकांना याबाबत अलर्ट जारी केला आहे. 1 जुलै आता जवळ आला आहे, त्यामुळे बँकेने पुन्हा एकदा जाहिरातींद्वारे सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना याची आठवण करुन दिली आहे. कॅनरा बँकेत सिंडिकेट बॅंकेच्या विलीनीकरणानंतर SYNB पासून सुरू होणार्‍या सर्व eSyndicate IFSC बदलण्यात आले आहेत. त्यामुळे SYNB ने सुरू होणारे सर्व IFSC 1 जुलै 2021 पासून अक्षम असतील.


बँकेचे वक्तव्य


बँकेने असे म्हटले आहे की, ग्राहकांनी त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवणाऱ्या सगळ्या लोकांना कळवावे की, आता त्यांचा  NEFT/RTGS/IMPS वर व्यवहार करताना. CNRBपासून सुरू होणारा नवीन IFSC वापरावा. कॅनरा बँकेने सिंडिकेट बँकेच्या पूर्वीच्या IFSC मध्ये CNRB आणि 10000 अ‍ॅड करावे, म्हणजेच जर तुमचे जुने IFSC SYNB0003687 असते, तर आता नवीन IFSCच्या जागी CNRB0013687 हा IFSC असणार आहे.


त्वरित बँकेशी संपर्क साधा


ग्राहकांनी नवीन कोड मिळवण्यासाठी सिंडिकेट बँकेचे ब्राँचचे नवीन IFSC आणि MICR कोड हे कॅनरा बँकेच्या संकेतस्थळावर म्हणजे  https://www.canarabank.com/ वर भेट द्या.  अधिक माहितीसाठी,  Below 'What's New' वर जा आणि 'KIND ATTN eSYNDIATE CUSTOMERS: KNOW YOUR NEW IFSC'वर क्लिक करा. या व्यतिरिक्त कॅनरा बँकेच्या ग्राहक सेवेवर 18004250018 वर संपर्क साधता येईल.