मुंबई : गुरमीत राम रहीम याला आता आणखीन एक जोरदार झटका मिळाला आहे. बलात्कार प्रकरणात २० वर्षांची शिक्षा झाल्यानंतर ट्विटरने अकाऊंट बंद केलं. त्यानंतर आता राम रहीमला बॉलिवूडमध्येही प्रवेश बंदी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनने गुरमीत बाबा राम रहिमचा सिनेमा आणि सिरीयल्समध्ये काम करण्याचा परवाना रद्द केला आहे.


गुंड आणि बलात्काऱ्याला जागा नाही


फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनने म्हटलं की, कुठल्याही गुंडाला, बलात्कारी व्यक्तीला आणि हत्याऱ्याला कुठलीही जागा नाहीये.


आम्ही पीडितांच्या भावनांचा आदर करतो


फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनने म्हटले की, आम्ही पीडित नागरिकांच्या भावनांचा आदर करतो आणि न्यायव्यवस्थेसोबत आहोत. त्यामुळेच डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याचं सदस्यत्व रद्द केलं आहे. तसेच त्याची मुलगी हनीप्रीत हिचंही सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे.


राम रहिमला बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.