IGNOU June Term End Exam Guidelines : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) ची 22 जुलैपासून सुरु झालेली जून टर्म एन्ड परीक्षा (June Term End Exam) आयोजित केली आहे. या परीक्षा 5 सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत. विद्यापीठाने देशभरात 831 आणि परदेशात 18 परीक्षा केंद्रे स्थापन केले आहेत. याव्यतिरिक्त देशभरातील विविध कारागृहांमध्ये कैदी उमेदवारांसाठी 82 परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. यावेळी जून TEE साठी अर्ज केलेल्या 7,69,482 विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे इग्नूने जारी केली आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापूर्वी खाली दिलेल्या जून टर्म एंड परीक्षा (June Term End Exam Guidelines) मार्गदर्शक तत्त्वे वाचण्याची विनंती देखील केली आहे.


IGNOU June Term End Exam Guidelines


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


1. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने परीक्षा केंद्रांना सूचना दिल्या आहेत की, जर विद्यार्थ्यांकडे प्रवेशपत्र किंवा हॉल तिकीट नसेल, पण त्याचे नाव अटेंडेंस शीट असेल तर त्यांना परीक्षेला बसू द्यावं.
2. परीक्षा केंद्रांना राज्य आणि केंद्र सरकारने जारी केलेल्या कोविड-19 प्रोटोकॉलचं पालन करावं लागेल.
3. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडे परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यापीठ किंवा सरकारने जारी केलेला वैध फोटो ओळखपत्र असणं आवश्यक आहे.
4. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मोबाईल फोन, ब्लूटूथ, कॅल्क्युलेटर यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्याची परवानगी नाही.


परीक्षेची वेळ



जून TEE चे प्रवेशपत्र IGNOU द्वारे बुधवारी म्हणजेच 20 जुलै 2022 रोजी जारी केलं गेलं आहे. जूनच्या TEE परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतल्या जातील. सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत पहिल्या शिफ्टमध्ये परीक्षा घेतली जाईल. दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी 2 ते 5 या वेळेत परीक्षा होणार आहे. पण, परीक्षेची वेळही प्रश्नपत्रिकेत नमूद केली जाईल.


तुम्ही या भाषेत प्रश्नांची उत्तरे देखील देऊ शकता



IGNOU ने सांगितलं आहे की प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे त्याच भाषेत स्वीकारले जातील ज्या भाषेत कोर्स ऑफर केला गेला होता. विद्यार्थ्यांनी इतर कोणत्याही भाषेत प्रश्नांची उत्तरे दिल्यास त्यांची प्रत तपासली जाणार नसल्याचंही सांगितलं आहे. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मात्र हिंदी माध्यमात परीक्षा देता येणार आहे.