मुंबई : IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेशच्या आदिवासींचे आयुष्य बदलले आहे. विद्यार्थ्यांचा एक प्रयोग आदिवासींसाठी वरदान ठरला आहे. IIT च्या विद्यार्थ्यांनी बैतुलच्या बंचा गावातल्या सर्व ७४ घरात सौर उर्जेचा उपयोग करणाऱ्या प्लेट लावल्या आहेत. जेवण बनवण्यासाठी देखील याचा वापर होत आहे. ज्याचे मॉ़डेल IIT बॉम्बेच्या मुलांनी बनवले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारद्वारे प्रयोगासाठी या गावाची निवड करण्यात आली होती. हे काम डिसेंबर २०१८ मध्ये पूर्ण करण्यात आले.


बैतुलच्या बंचा गावातल्या रहिवाशी म्हणतात, त्यांना आता जंगलात जाण्याची गरज भासत नाही, आणि आग विझवण्याची गरज भासत नाही. भांडी आणि भिंती आता काळ्या नाही होत. जेवण पण वेळवर बनवता येत आहे. यामुळे वेळही वाचतोय.