मुंबई : मॉन्सून संपूर्ण देशात वेगाने सक्रीय होत आहे. महाराष्ट्रातून मॉन्सूनने आता छत्तीसगढ, बिहारकडे आगेकूच केली आहे. मात्र, त्यापूर्वीच हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील ७२ तांसात देशातील १६ राज्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. त्यामुळे हवामान खात्याने या राज्यांना सतर्क राहण्याचे आवाहनही नागरिकांना केले आहे.


मुसळधार पावसाचा इशारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील ७२ तासांमध्ये दिल्ली-एनसीआरसह चंढीगढ आणि उत्तर प्रदेशमधील काही भागांत वीजांच्या कडकडासह वादळीवारे आणि मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हवामान खात्याने समुद्र किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहेत. तसेच समुद्रात किंवा नदीत न जाण्याचेही आवाहन केले आहे. 


या राज्यांत अलर्ट 


हवामान खात्याच्या मते, दिल्ली-एनसीआर आणि परिसरात आगामी २४ तास फार महत्वाचे असणार आहेत. हरियाणा, चंडीगढ, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थानमध्ये वादळीवाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर, मध्यप्रदेश छत्तीसगढ, विदर्भ, पश्चिम बंगाल, सिक्किम, ओडीशा, बिहार, झारखंड, उत्तराखंज आणि हिमाचल प्रदेशात वीजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


४०० जणांचे बळी


गेल्या महिन्याभरात खराब हवामानामुळे मोठं नुकसान झालं आहे. या दरम्यान झालेल्या अपघातांमुळे ४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.


११ जूनसाठी अलर्ट


हवामान खात्याच्या मते, कर्नाटक, गोवा, कोकण, ओडिशा, केरळ, आसाम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मिझारोम आणि मेघालयमध्ये ११ जून रोजी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याने अलर्ट जाहीर केला आहे. IMD च्या मते, किनारपट्टीवरील परिसरात ५० ते ६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात.


१२ जूनसाठी अलर्ट 


हवामान विभागाच्या मते, १२ जून रोजी पश्चिम बंगाल, झारखंड, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.


१३ जूनसाठी अलर्ट 


मौसम विभागाच्या मते, १३ जून रोजी कर्नाटक, गोवा, कोकण, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, केरळ, आसाम, नागालँड, मणिपुर, त्रिपुरा, मिझारोम आणि मेघालयमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.