नवी दिल्ली : गेल्या दोन-तीन दिवसांपासून वाढलेलं तापमान लवकरच कमी होऊ शकतं कारण हवामान खात्याने पुन्हा पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. 


कोणत्या तारखेला होणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय हवामान खात्यानुसार २४ फेब्रुवारीला उत्तर भारतातील काही भागांमध्ये बर्फवॄष्टी आणि मैदानी राज्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यासोबतच मध्य आणि पश्चिम भारतातील काही भागांमध्ये पाऊसासोबत गारपिटीचाही अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 


पहाडांवर बर्फवृष्टी


हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार २४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये काही जागांवर पाऊस किंवा बर्फवृष्टी होऊ शकते. डोंगराळ भागात बर्फवृष्टी झाल्याने मैदानी भागांमध्ये तापमानात उतार होऊ शकतो. 


या राज्यांमध्ये गारपिटीची शक्यता


हवामान खात्यानुसार २४ फेब्रुवारीला उत्तराखंड, पंजाब, हरयाणा, चंडीगढ, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलीये. काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. 


पिकांचं होऊ शकतं नुकसान


काही दिवसांपूर्वीच मध्य आणि पश्चिम भारतातील काही भागांमध्ये गारपीट झाली होती. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा ही शक्यता आहे. त्यामुळे शेतक-यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.