Weather Update 17th July : दिल्लीसह देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) अनेक राज्यांसाठी अलर्ट जारी केला असून पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. (#DelhiFloods)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीनंतर यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने दिल्लीतील अनेक भाग जलमय झाले होते. आता हळू हळू दिल्लीतील परिस्थिती सुधारतेय. दिल्लीतील जलमय भागातील पाणी बाहेर पडतंय. पण सुरक्षिच्यादृष्टीकोनातून यापूर्वीच हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. 


दिल्लीच्या काही भागात रविवारी मुसळधार पाऊस झाला. तर आज हलका पाऊस आणि गडगडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे. यमुनेच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. पण सतत पडणाऱ्या पावसामुळे चिंता अद्याप कमी झालेली नाही. पुढील चार ते पाच दिवस दिल्लीत मध्यम पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे. (IMD Rainfall Alert delhi haryana punjab rajasthan rain weather update 17th july)


'या' राज्यांना यलो अलर्ट 


हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भारतीय हवामान खात्याने (IMD) यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्र, गोवा, गुजरात, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 


 


हेसुद्धा वाचा - Maharashtra Weather : मुंबईकरांनो काळजी घ्या; पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, विदर्भातही जोर वाढणार


 


हरियाणात काय आहे परिस्थिती ? 


हवामान खात्याने (IMD) गुरुग्राम वगळता हरियाणातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आजपासून 20 जुलैपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.  हरियाणामध्ये कमी दाब निर्माण होत आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या दमट वाऱ्यांचा वेग वाढेल आणि काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याने (IMD) सांगितलं आहे. 


बिहारमध्ये वादळाचा इशारा


बिहारमधील वातावरणात पुन्हा बदल झाला अशून मान्सूनने वेग धरला आहे. बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा हवामान खात्याने (IMD) दिला आहे. राजधानी पाटण्यात आज अंशत: ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.