योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : चीनच्या करून व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात दहशत आहे तेथील पर्यटनात कोणीच जायला तयार नाही की तिथल्या लोकांना आपल्या देशात येऊ देण्यास अनेकांनी निर्बंध घातले आहेत आता याचा फटका चीनच्या कांद्यालाही बसला आहे. कोरोनाचा आता कांद्यालाही झटका बसला आहे. जागतिक बाजारपेठेत चीनचा कांदा कुणी घेत नसल्याचं चित्र समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक बाजारपेठेत कांदा निर्यातीसाठी भारताचे प्रतिस्पर्धी आहेत नेदरलँड आणि चीन . गेल्या वर्षी भारतात कांदा कमी असल्यानं चीननं निर्यातीत भारताला मागे टाकलं होतं. आता मात्र चीनचा कांदाही कोरोनाच्या विळख्यात सापडलाय. कुठलाच देश चीनचा कांदा घ्यायला तयार नाही.(पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा परिणाम) 


अशा वेळी भारताचा कांद्याला जागतिक बाजारपेठेत चांगला फायदा होईल. त्यामुळे कांद्याची निर्यातबंदी तातडीनं उठवण्याची मागणी होत आहे. कांदा निर्यातबंदी लवकर उठली तर परकीय चलनही बक्कळ मिळेल आणि शेतकऱ्यांनाही पैसे मिळतील. गरज आहे ती तातडीनं निर्णय घेण्याची. या निर्णयाकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. 



कोरोना व्हायरसच्या संकटाचा परिणाम आता जगातील तेल बाजारावरही दिसण्याची मोठी शक्यता आहे. जगातील मोठी तेल उत्पादनं, कोरोनामुळे आपलं उत्पादन कमी करू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर कायम ठेवण्याची मागणी लक्षात घेता या आठवड्यात ओपेक आणि त्याच्या सहयोगी संघटनांची बैठक होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या वर्षाभरातील किंमतीच्या तुलनेत, आता सध्या कच्च्या तेलाच्या किंमती सर्वात कमी आहेत. जानेवारी महिन्यापासून कच्च्या तेलाच्या किंमतीत २० टक्क्यांची घसरण झाली आहे.