अमर काणे /  गुवाहाटी : Maharashtra Political Crisis Latest Updates: शिवसेना ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50 आमदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. गुवाहाटीतील एकनाथ शिंदे गटाचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदारांना आपापल्या मतदारसंघांमध्ये मेळावे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार मेळाव्यातून पुढे न्या, आपण शिवसेनेतच आहोत. आपल्याबद्दलचे गैरसमज दूर करा. सगळ्या कार्यकर्त्यांना एकसंध ठेवा असं एकनाथ शिंदे म्हणालेत.


त्याचवेळी एकनाथ शिंदे गट प्रवक्त्यांची नेमणूक करणार आहेत. प्रवक्ता गटाची भूमिका माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहचवणार आहेत. प्रवक्ते नेमणुकीचा निर्णय आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. जनतेपर्यंत गटाची भूमिका पोहोचवण्यासाठी प्रवक्ता नेमणूक करण्यात येणार आहे.


दरम्यान, मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं राहणार, कुठल्याही परिस्थितीत भाजपात प्रवेश करणार नाही असं ट्विट बंडखोर शिवसेना आमदार योगेश कदम यांनी केले आहे. राष्ट्रवादीपासून शिवसेनेला वाचवण्यासाठीच आपलं पाऊल असल्याचंही योगेश कदम यांनी म्हटलंय. योगेश कदम हे दापोलीचे शिवसेना आमदार असून सध्या ते शिंदे गटासोबत गुवाहाटीत आहेत.