Switching New Job: स्पर्धेच्या जगात प्रत्येकालाच आपण पुढे जावं अशी इच्छा असते. त्यासाठी जीवतोड मेहनत करुन आपलं लक्ष्य गाठायचे असते. अनेकदा एकाच कंपनीत काम करुन आपलं ध्येय गाठणं साध्य होत नाही. अशावेळी लोकं दुसरी नोकरी शोधतात. आपल्या करिअरसाठी जॉब स्विचिंग हा महत्त्वाचा टप्पा असतो. जॉब स्विच केल्यास नवीन जबाबदारी तसंच, पगारातही वाढ होत असते. त्यामुळं अलीकडच्या कॉर्पोरेट युगात जॉब स्वीच करणे हे अगदी सहज शक्य होते. मात्र नवीन कंपनी जॉइन करण्यापूर्वी तुम्हाला त्या कंपनीचे वर्क कल्चर पारखून घेण्याची गरज आहे. त्यामुळं मुलाखतीवेळीच हे प्रश्न विचारून तुम्ही कंपनीबाबतची माहिती काढून घेऊ शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी वर्क कल्चर आणि स्वतःचा व्यक्तिमत्व विकासही जोपासला जाणं महत्त्वाचं असतं. त्यामुळं मुलाखतीला जाण्याआधी तुमच्या Human Resourcse( HR)ला काही प्रश्न विचारुन खात्री करुन घेणे गरजेचे आहे. अन्यथा कंपनी जॉइन केल्यानंतर तुम्हाला कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. मुलाखतीला जातानाच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करुन घ्या. अशावेळी एचआरला कोणते प्रश्न विचारावेत याविषयी जाणून घ्या. 


१)  कोणत्याही कंपनीत जॉइन करण्याआधी एचआरला कंपनीत तुमच्यावर देण्यात येणाऱ्या जबाबदारीविषयी बोलून घ्या. जेणेकरुन पुढे जाऊन कोणत्याहीप्रकारे कन्फ्युजन होणार नाही. 


२) जॉइन केल्यानंतर तुम्ही कोणत्या टीममध्ये असणार आहात हे माहित करुन घेणे तुमचा अधिकार आहे. तसंच, तुमच्या टीममध्ये किती जण असणार आहेत आणि तुमच्या टीमचा लीडर कोण असेल. तसंच, तुमचे रिपोर्टिंग मॅनेजर यांच्याबाबतही माहिती करुन घ्या. 


३) सॅलरीबाबत बोलत असताना तुमच्या अकाउंटमध्ये किती सॅलरी येईल याची सविस्तर माहिती Hrला विचारुन घ्या. त्याचबरोबर पीएफ किती कट होणार याचीही चौकशी करायला विसरु नका. तसंच, किती सुट्ट्या घेतल्यानंतर सॅलरी कापण्यात येईल, हेदेखील विचारुन घ्या. 


४ मुलाखतीतच तुम्हाला वर्षभराच्या किती सुट्ट्या असतील हेदेखील विचारुन घ्या. कारण प्रत्येक कंपनीची पॉलिसी ही वेगळी असते, अशावेळी बिनधास्त सुट्ट्यांबाबतचा प्रश्न विचारला पाहिजे. 


५ प्रमोशनहे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते. प्रमोशन मिळवण्यासाठी कंपनीचे काय नियम आहेत, त्यासाठी कसं काम करावं लागेल? यासंबंधी सर्व प्रश्न व्यवस्थित विचारुन सर्व माहिती काढून घ्या. 


६. कंपनी जॉइन करण्यापूर्वी तुम्हाला किती तास ड्युटी करावी लागेल. तसंच, ओव्हर टाइमदेखील करावा लागेल का हेदेखील विचारुन घ्या. तसंच, जर ओव्हर टाइम करावा लागला तर एक्स्ट्रा पैसे मिळणार का, हे देखील विचारुन घ्या.