Stock to buy: `हा` स्टॉक तुम्हाला वर्षभरात करेल मालामाल, वाट कसली पाहताय?
जर तुम्ही या स्टॉकमध्ये (stock) 1 लाख रूपये गुंतवले असतील तर आता तुम्हाला या स्टॉकमधून 9 लाख रूपयांचा फायदा होईल.
Multibagger Stock: सध्या आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधत असतो. कुठला स्टॉक (Stocks to buy) हा घेण्याजोगा आहे किंवा कुठल्याही स्टॉकमधून आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. अशा सर्वच गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते ती आपण घेतली आणि आपल्याला योग्य मार्गदर्शक मिळाले तर आपणही नक्कीच चांगल्या प्रकारे स्टॉक मार्केटमध्ये यश मिळवू शकतो. सध्या असाच एक स्टॉक शेअर मार्केटवर ट्रेण्डिंग (Trading) आहे. या मल्टिबॅगर स्टॉकनं गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी केली आहे आणि मुख्य म्हणजे या स्टॉकनं गुंतवणूकदारांना चांगलाच परतावा दिला आहे. (in 1 year ₹1 lakh becomes ₹9 lakh this company will split the share note the record date)
या स्टॉकचं नाव आहे. मेफकॉम कॅपिटल मार्केट्स लि. गेल्या एका वर्षातीलय या स्टॉकचा विचार केला तर या स्टॉकनं जवळपास यातून 800% परतावा म्हणजेच रिटर्न्स दिले आहेत. या स्टॉकची वर्षभरापुर्वीची स्थिती आणि आत्ताची स्थिती फारच वेगळी आहे. जर तुम्ही या स्टॉकमध्ये (stock) 1 लाख रूपये गुंतवले असतील तर आता तुम्हाला या स्टॉकमधून 9 लाख रूपयांचा फायदा होईल.
पाहा किती मिळाले रिटर्न्स:
हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....
सोमवारी (7 नोव्हेंबर) मेफकॉम (mefcom) कॅपिटल मार्केट्सचे शेअर्स 158.90 रुपयांच्या वर गेले. या शेअरनं वर्षभरात 800 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 9 नोव्हेंबर 2021 रोजी NSE वर शेअरची किंमत रु. 17.65 वर होती त्यानूसार गुंतवणूकदारांना 800.84 टक्के इतका मजबूत परतावा (returns) मिळाला आहे. गेल्या 6 महिन्यांत स्टॉकने 450 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. 16.81 हा स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक होता.
कंपनी करणार विभाजन? (Stock Split)
हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद
मेफकॉम ही कंपनी फायनॅशियल सर्विस देणारी कंपनी आहे. स्मॉल कॅपची (Small Cup) ही कंपनी आता लवकरच आपल्या स्टॉकची विभागणी करणार आहे. हे विभाजन साधारणपणे कंपनीच्या बोर्डानुसार, 1:5 च्या प्रमाणात शेअर विभाजन असेल. 4 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीच्या बोर्डानं बैठकीत स्टॉक विभाजनाची रेकॉर्ड तारिख कन्फर्म केली आहे. तर विभाजनासाठी कंपनीनं 2 डिसेंबर 2022 ही तारीख ठरवली आहे. 10 दर्शनी मूल्याचा असणारा (face Value) प्रत्येक इक्विटी शेअर हा रु 2 दर्शनी मूल्याच्या 5 इक्विटी समभागांमध्ये (Equity share) विभाजित होईल. म्हणजेच कंपनीच्या भागधारकांना 1 इक्विटी शेअर ऐवजी 5 इक्विटी शेअर्स मिळणार आहेत.