नवी दिल्ली : देशात 2019 मध्ये 110 वाघांचा तर 493 बिबट्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाईल्डलाईफ पोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार वाघांचा आणि बिबट्यांच्या मृत्यूंचा आकडा समोर आला आहे. 2018 मध्ये 104 वाघांचा मृत्यू झाला होता. तर तर 500 बिबट्यांचा मृत्यू झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 मध्ये देशात सर्वाधिक वाघांचा मृत्यू मध्य प्रदेशात झाला आहे. तिथं 29 वाघांचा मृत्यू झाला. तर त्याखालोखाल महाराष्ट्रात 22 वाघांचा मृत्यू झाला आहे. 


महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांत रस्ते अपघातात अनेक बिबटचा मृत्यू झाला आहे. वाघ आणि बिबटच्या मृत्यूंच्या घटनांमध्ये होत असलेल्या वाढीमुळं वन्यजीवप्रेमी अस्वस्थ झाले आहे. दुसरीकडे नागरी वस्तीत बिबट्या येण्याचे प्रमाण देखील वाढले आहे, वाढत्या शहरीकरणामुळे हे प्रमाण वाढल्याचं सांगण्यात येतं मात्र अनेक वेळा, नागरी वस्तीत आलेल्या बिबट्यासारखे प्राणी वनविभागाचे कर्मचारी परत जंगलात सोडतात.