बॉयफ्रेंड-ग्रर्लफ्रेंडनं किडनॅपींगचा परफेक्ट प्लॅन आखला, पण तो असा फसला
खरेतर या व्यक्तीने रिचा, किनसुख आणि त्यांच्या ड्रायव्हरला किडनॅप केले.
मुंबई : देशाच्या राजधानीतून अपहरणाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरण प्रकरणाची उकल करताना दिल्ली पोलिसांनी बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडसह 4 आरोपींना अटक केली आहे. कटाचा एक भाग म्हणून बँक्वेट हॉलच्या मालकाच्या मुलाचे अपहरण करून आरोपींनी एक कोटी रुपयांची मागणी केली होती. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपींना 50 लाख रुपये दिले होते. मात्र हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर या सगळ्यांचे पितळ उघडे पडले. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३६ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 डिसेंबर रोजी बँक्वेट हॉलचे मालक विकास यांचा मुलगा किनसुख, त्याचा ड्रायव्हर आणि फ्लॉवर डेकोरेटर रिचा हे सकाळी गाझीपूर फूल मंडीमध्ये खरेदीसाठी गेले होते. किनसुख आणि रिचा फूलबाजारातून जेव्हा घरी परत यायला निघाले तेव्हा, त्यांनी कोणीतरी बंदुकाची भिती दाखवून किडनॅप केलं.
खरेतर या व्यक्तीने रिचा, किनसुख आणि त्यांच्या ड्रायव्हरला किडनॅप केले आणि त्यानंतर किंसुखचे वडील विकास यांना फोन करून एक कोटी रुपयांची मागितली गेली.
आपल्या मुलाला किडनॅपरच्या ताब्यातुन वाचवण्यासाठी विकासने गाझीपूरजवळ 50 लाख रुपये आणले. 50 लाख रुपये घेऊन अपहरणकर्त्याने किनसुख, रिचा आणि त्यांच्या ड्रायव्हरला सोडले.
मात्र या किडनॅपरने विकासला पिस्तुलाची भिती दाखवत कारमध्ये बसवले आणि सुमारे 50 किलोमीटरपर्यंत त्याने दिल्लीत फिरवले. त्यानंतर अपहरणकर्त्याने विकासला पश्चिम विहार परिसरात कारमध्येच ठेऊन 50 लाख रुपये घेऊन पळ काढला.
पोलिसांनी अशा प्रकारे किडनॅपरला शोधले
या प्रकरणाची सुरूवात गाजीपुर येथून सुरू झाली. त्यामुळे पटपडगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक देखरेख आणि सीसीटीव्हीच्या मदतीने या प्रकरणाचा छडा लावला. तपासादरम्यान पोलिसांना ड्रायव्हर आणि फुल डेकोरेटर रीचावर संशय आला.
त्यानंतर पटपरगंज इंडस्ट्रियल पोलिस स्टेशनचे एसएचओ सुरेंद्र कुमार यांनी ड्रायव्हरचा मित्र गुरमीतला अटक केली. यानंतर रिचा आणि तिच्या आईलाही अटक करण्यात आली होती. चौकशी केली असता चौघांचा या अपहरणाच्या कटात सहभाग असल्याचे पोलींनासमोर उघड झाले.
दिल्लीच्या पूर्व जिल्ह्याचे डीसीपी प्रियंका कश्यप यांनी सांगितले की, एसीपी नीरव पटेल आणि पटपरगंज औद्योगिक क्षेत्राचे एसएचओ सुरेंद्र कुमार यांच्या पथकाने चार आरोपींना अटक केली.
हा संपूर्ण प्लॅन डेकोरेटर रीचा आणि तिचा बॉयफ्रेंड गुरमीतचा होता, ज्यामुळे इतर दोन लोकांनी त्यांना मदत केली.