गुजरात : देशात कोरोनची रुग्ण संख्या दिवसें-दिवस नवीन उच्चांक गाठत आहे. अशा परिस्थितीत असे बरेच लोक आहेत, जे माणुसकी दाखवण्यात अजिबात विचार करत नाहीत. गुजरातमधील अशाच एका महिलेने माणूसकीचे उदाहरण जगा समोर ठेवले आहे. नॅन्सी आयजा मिस्त्री (Nancy Ayeza Mistry) असे या महिलेचे नाव आहे. ती 4 महिन्याची गर्भवती आहेत (Pregnant Nurse) जी या अवस्थेच सुद्धा कोरोनाच्या रूग्णांची काळजी घेत आहे. ती गर्भवती आहे तरी देखील काम करत आहे. त्यापेक्षा ही धक्कादायक बाब म्हणजे, ती दिवसभर उपवास ठेवून आपल्या धर्माचे पालन करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएनआयच्या अहवालानुसार, नॅन्सी आयझा मिस्त्री ही 4 महिन्यांची गरोदर आहे आणि ती सुरतमधील कोव्हिड केअर सेंटरमध्ये आपली ड्यूटी करत आहे. सध्या रमजान महिना सुरू आहे. अशा परिस्थितीत नॅन्सी उपवास करून आपल्या धर्माचे पालन करण्यास देखील मागेपुढे पाहत नाही. या विचार तिला विचारले असता ती म्हणली की, "मी एक नर्स म्हणून माझं कर्तव्य पार पाडत आहे. लोकांची सेवा करणे ही माझ्यासाठी सर्वात मोठी पूजा आहे."



गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना सांगितले की, लसीकरण आणि विविध गोष्टींचे काटेकोरपणे पालन करून आमचा राज्य कोव्हिड -19 या रोगाचा सामना करत आहे आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर देखील भर दिला जात आहे. रूपानीने हे वक्तव्य पंतप्रधानांच्या डिजिटल बैठकीत केलं. ही बैठक देशातील सर्वाधीक कोरोना बाधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यां सोबत पंतप्रधान मोदी यांनी घेतली होती.


गुजरातचे मुख्यमंत्री म्हणाले की, गुजरातमध्ये सरकारी यंत्रणा, खासगी क्षेत्र आणि सामाजिक संस्था लोकांच्या मदतीसाठी एकत्रितपणे काम करत आहेत. रुपाणी यांनी पंतप्रधानांना सांगितले की, "राज्यात कोरोना रूग्णांसाठी 90 हजारांपेक्षा जास्त बेड्स आहेत ज्यात 11 हजार 500 आयसीयू बेड्स, तर 51 हजार ऑक्सिजन बेड्सचा समावेश आहे. तसेच टेस्टींगची संख्या वाढवून 1.75 लाख करण्यात आली आहे, त्यामद्ये 10 हजार आरटी-पीसीआर टेस्टचा समावेश आहेत.


गुजरातचे मुख्यमंत्री म्हणाले की, सामाजिक आणि धार्मिक संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत. त्यांनी मोरबीचे उदाहरण दिले, जेथे अशा गटांद्वारे ज्यांना किरकोळ लक्षणे आहेत, अशा रुग्णांसाठी 630 बेड्सची सोय करण्यात आली आहे. असे पाच कोविड केअर सेंटर सुद्धा त्यांनी सुरु केले आहेत.


दुसरीकडे, राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमधील गुरुद्वारानेही एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. गुरुद्वारा रुग्णांना ऑक्सिजन सेवा देत आहेत. कोरोना संसर्गामुळे रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता, गाझियाबादच्या इंदिरापुरम गुरुद्वारामध्ये ऑक्सिजन सेवा सुरू केली आहे.