जम्मू : Petrol Bomb At CRPF Camp : बातमी आहे एका दहशतवादी हल्ल्याची. काश्मीरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर पेट्रोल बॉम्ब हल्ला करण्यात आला. दरम्यान, या हल्ल्यानंतर बुरखाधारी महिला फरार झाल्या आहेत. ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. (In Jammu and Kashmir,'s Sopore, Woman Hurls Petrol Bomb At CRPF Camp) दरम्यान, सोपोरमधील सीआरपीएफच्या मुख्य चौकाजवळील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) कार्यालयाजवळ ही घटना घडली. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू आहे. हल्लेखोर ओव्हर ग्राउंड वर्कर (OGW) असल्याचा संशय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर पेट्रोल बॉम्ब हल्ला केला केल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. बुरखा परिधान केलेल्या एका व्यक्तीने हा हल्ला केल्याचे सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे. बुरखाधारी महिला या ठिकाणी येते आणि बॅगेतील पेट्रोल बॉम्ब काढून सीआरपीएफ कॅम्पच्या दिशेने फेकते आणि लगेच तिथून पळ काढते, असे सीसीटीव्हीत दिसून येत आहे.


बुरखा घातलेली एक महिला सीआरपीएफचे जवान जिथे तैनात आहेत त्या भागाकडे जाताना दिसते. रस्त्यावर थांबून, ती सैन्याच्या दिशेने पेट्रोल बॉम्ब फेकण्यासाठी ती तिच्या पर्समधून काहीतरी काढताना दिसत आहे. त्यानंतर ती पळून जाते. स्फोटानंतर काही प्रवासी सुरक्षिततेसाठी ओरडतानाही दिसले. दरम्यान, आग विझवण्यासाठी सीआरपीएफचे जवानांनी पाण्याच्या बादल्यांचा वापर केल्याचे दिसून येत आहे. 



हा हल्ला करणारी महिला आहे की पुरूष दहशतवादी ते कळू शकलेले नाही. या घटनेतील बुरखाधारी व्यक्तीचा आता शोध घेतला जातो आहे. मात्र, या हल्ल्यात सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाही.