Jharkhand Crime News :  झारखंडमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका माथेफिरुने  बायकोला सोडून भावाच्या बायकोशी लग्न केले आणि मग तिचाच जीव घेतला आहे. ही अजब क्राईम स्टोरी पाहून पोलिसही चक्रावले आहे. पोलिस तपासात हत्येमागे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे भाऊ बेपत्ता असताना आरोपीने हे कृत्य केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोरीओ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बियासी प्रधान टोला येथे ही घटना घडली आहे. तला बाबू हंसदा असे आरोपीचे नाव आहे. बाबू याने आपल्या दुसऱ्या पत्नीची हत्या केली. यानंतर तो स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याच्या मृत पत्नीचा मृतदेह ताब्यात घेवून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. बाबूयाने हत्या केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे. मात्र, हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र पोलिसांना घटनास्थळी सापडलेले नाही. 


आरोपीने भावाच्या पत्नीसह केला विवाह


आरोपीने आपल्या दुसऱ्या पत्नीची हत्या केली आहे. आपरोपीने भावाच्या पत्नीसह म्हणजेच वहिनीसोबतच लग्न केले होते. आरोपीचे आधीचे लग्न झाले आहे. त्याला दोन मुल देखील आहेत. मात्र, आपल्या पत्नी आणि मुलांना सोडून त्याने वहिनीशी लग्न केले. आरोपीचा भाऊ हा मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याच्याच गैरफायदा घेत त्याने वहिनीसोबत लग्न केले.


का केली पत्नीची हत्या?


आरोपीने आपल्या दुसऱ्या पत्नीची हत्या केली आहे. लग्न झाल्यापासून आपरोपी आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीमध्ये सातत्याने वाद होते. याच वादातून आरोपीने आपल्या दुसऱ्या पत्नीची धारधार शस्त्राने वार करत हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: पोलिसा ठाण्यात हजर झाला.  


वसईत भर रस्त्यात महिलेला मारहाण 


वसईत भर रस्त्यात एका महिलेला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही दृश्यांमध्ये कैद झाली आहेत. वसई पश्चिमेच्या स्टेशन परिसरात ही घटना घडली असून या महिलेच्या कंबरेवर तिचा मुलगा असताना एक जण तिला मारहाण करत असल्याचे सिसिटीव्ही दृश्यांमध्ये दिसत आहे. केस उपटून, हाताने मारून हा इसम त्या महिलेला मारहाण करत आहे. कौटुंबिक वादात पती पत्नीला मारहाण करत असल्याचे प्राथमिक पाहणीत दिसत असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होऊ लागला आहे. रविवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला आहे. जवळच माणिकपूर पोलीस ठाणे आहे मात्र पोलीस ठाण्यात या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या प्रकारावरुन महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.