बंगळुरु : जनता दल (सेक्युलर)चे नेते एच. डी. कुमारस्वामी आज विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. दरम्यान, याआधी भाजपचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच राजीनामा दिला. त्यामुळे भाजपला प्रथम संधी देऊनही त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. त्यामुळे राज्यपाल यांनी कुमारस्वामी यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले. काल त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज कुमारस्वामी बहुमत सिद्ध करणार आहेत. दरम्यान, काल त्यांच्या शपथविधीदरम्यान २०१९ लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी, भाजपविरोधी महाआघाडीचं जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काल केवळ दोनच नेत्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. आज विधानसभेत बहुमत चाचणी होईल त्यानंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.  


दरम्यान, काल कर्नाटमध्ये एच.डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याला विरोधक एकवटल्याचे चित्र दिसून आले. यावेळी भाजप आणि नरेंद्र मोदी विरोधकांनी एका व्यासपीठावर येत हम साथ साथ है असल्याचे दाखवून दिले. शक्तीप्रदर्शनानंतरही विरोधकांची महाआघाडी बनणार नसल्याचे संकेत मिळतायत. माकपचे सचचिटणीस सीताराम येचुरी यांनी याबाबत संकेत दिलेत. भाजपला रोखण्यासाठी विरोधकांच्या एकीच्या नावाखाली तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी हात मिळवण्याचा प्रश्नच नाही, असा सवाल येचुरी यांनी उपस्थित केलाय.  



कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून जनता दल सेक्युलरचे एच. डी. कुमारस्वामी यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि दलित नेते जी. परमेश्वर यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कर्नाटक विधानसभेच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यात राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. कर्नाटकातला गेल्या आठवड्याभरातला हा दुसरा शपथविधी सोहळा होता.