Crime News, जालंधर : महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच आता पुरुष देखील अत्याचाराला बळी पडत आहेत. चार तरुणींनी अपहरण करुन दारु पाजून जबरदस्तीने बलात्कार केल्याचा आरोप पंजाबमधील(Punjab) एका तरुणाने केला आहे. चार तरुणींनी एका तरुणावर केलेल्या या अत्याचाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित तरुण हा जालंधरमधील एका चामड्याच्या कारखान्यात काम करतो.  कारखान्यातून काम संपवून तो घरी निघाला होता. यावेळी रस्त्याने चालला असताना एक सफेद रंगाची कार त्याच्याजवळ येवून थांबली. या कारमधून चार महिला उतरल्या त्यांनी डोळ्यावर मिरची पूड फेकली आणि जबदरस्तीने कार बसवून अपहरण केले.


यानंतर या चौघींनी मला जबरदस्तीने दारु पाजली आणि माझ्यावर बलात्कार केला असा आरोप पीडित तरुणाने केला आहे. यानंतर या महिलांनी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधून माझे हात-पाय बांधून मला रस्त्यावर सोडून दिल्याचे देखील या तरुणाचे म्हणणे आहे.  कसा बस हा तरुण घरी पोहचला. यानंतर त्याने कुटुंबियांना याबाबत सांगितले. मात्र, या प्रकरणी त्याने पोलिसात तक्रार दिलेली नाही. स्थानिक प्रसार माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.