Rajasthan News : बहिण भावाचे नाते हे जगातील सर्वात सुंदर नातं असतं. बहिण भावाच्या अतूट प्रेमाची प्रत्यक्षात पहायला मिळाली आहे.  बहिणीच्या जळत्या चितेत  भावाने उडी घेतली आहे. राजस्थानमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे.  अंत्यसंस्कारावेळी हा प्रकार घडल्याने अत्यंविधीसाठी उपस्थित असलेले सगळेच गोंधळून गेले. जळत्या चितेत उडी घेतल्याने हा भाऊ गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. 


जळत्या चितेत उडी घेतली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमधील भिलवाडा येथे ही घटना घडली आहे. हे प्रकरण बागोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांकियास गावातील आहे. मीना असे मृत महिलेचे नाव आहे. मीना यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि चितेला अग्नी देण्यात आला. यानंतर सर्वजण थोडे दूर जाऊन बसले. यावेळी मीना यांचा भाऊ सुखदेव भिल याने त्याच्या जळत्या चितेत उडी घेतली.


प्रकृती गंभीर


सुखदेव यांनी बहिणीच्या जळत्या चितेत उडी घेतल्याने स्मशानात एकच गोंधळ उडाला. स्मशानात अंत्यविधीसाठी जमलेल्या नातेवाईंनी सुखदेव यांना जळत्या चितेतून बाहेर काढले.  सुखदेव हे या घटनेत गभीर रीत्या जखमी झाले आहेत. तात्काळ त्यांना उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेत सुखदेव 100 टक्के भाजले गेले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. 


बहिणीच्या जाण्याचे दुख: सहन झाले नाही


सुखदेव यांच्या त्यांची बहिण मीना यांचाच्यावर खूप जीव होता. सुखदेव हे मीना यांचे चुलत भाऊ होते. मात्र, दोघांनी एकमेकांना सख्ख्या भावंडाप्रमाणे माया लावली होती. यामुळे बहिणीच्या जाण्याचे दुख: सुखदेव यांना सहन झाले नाही. बहिणीच्या जळत्या चितेत त्यांनी उडी घेतली. 


अतूट प्रेम


बहिणीच्या मृत्यूनंतर स्वत:ला मृत्यूच्या दारात झोकून देणाऱ्या या भावाला पाहून सगळेच अचंबित झाले. बहिण भावाच्या अतूट प्रेमाची प्रचिती सगळ्यांना आली. सुखदेव हे कधीच मीना यांना एकटे सोडायचे नाहीत. मृत्यूनंतरही सुखदेव यांनी मीना यांना एकटे सोडले नाही. त्यांनी मीना यांना अग्नी दिल्यावर त्यांच्या जळत्या चितेत उडी घेतली.