मुंबई : 1 जानेवारीपासून रिझर्व्ह बँकेनं अनेक नियमांमध्ये मोठं बदल केले आहेत. बँक खात्यांसह ATMमधून पैसे काढण्याच्या नियमांमध्येही बदल झाले आहेच. त्यामुळे तुम्ही KYC, म्हणजे नो युवर कस्टमर नॉर्मस् पूर्ण केले नसेल, तर तुमचं बँक खातं देखील फ्रीज केलं जाऊ शकतं. RBIनं केलेल्या नियमांनुसार बँका आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्यांकडे ग्राहकांची अपडेट माहिती असणं बंधनकारक आहे. त्यामुळे बँकेकडे ग्राहकाचं फोटो आयडी आणि अॅड्रेस प्रूफ असला पाहिजे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे नवे नियम लागू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. बँक खात्याचं KYC नसेल तर 1 जानेवारीपासून ते गोठवलं जाईल.


आपण बँक खातं जेव्हा उघडतो, तेव्हा आपण KYC शी संबंधीत कागदपत्रं बँकेकडे देतो, मात्र तेवढ्यावर भागत नाही. KYC ही विशिष्ट कालावधीनंतर अपडेट कराविच लागते.


कमी जोखीम असलेल्या खातेदारांना दर 10 वर्षांनी तर जास्त जोखीम असलेल्या खातेदारांना दर 2 वर्षांनी KYC अपडेट करावं लागतं. बँकांसह अर्थपुरवठादार कंपन्या, म्युच्युअल फंड, ब्रोकिंग हाऊसेस आणि डिपॉझिटरीज् यांनाही KYCची अट बंधनकारक करण्यात आली आहे. याखेरीज रिझर्व्ह बँकेनं आणखी काही नियमांमध्येही बदल केले आहेत.


बँकेचे व्यवहार महागणार 


एटीएममधून पैसे काढणंही आता महागणार आहे. फ्री ट्रान्झॅक्शनची मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 20 ऐवजी 21 रुपये शुल्क आता भरावे लागणार आहेत.
बचत आणि चालू खात्यांमधून महिन्याला 25 हजारांपर्यंतची रक्कम कोणत्याही शुल्काशिवाय काढता येईल. त्यानंतर एकूण रकमेच्या अर्धा टक्का किंवा किमान 25 रुपये शुल्क बँकेला द्यावे लागेल. तसेच 10 हजारांपर्यंतची रोख रक्कम विनाशुल्क जमा करता येईल. मात्र त्यानंतरच्या रक्कमेवर अर्धा टक्का किंवा किमान 25 रुपये शुल्क द्यावं लागेल.


पोस्टाला पेमेंट बँकेचा दर्जा मिळाल्यामुळे 'इंडिया पोस्ट पेमेंट बँके'लाही रोख रक्कमेच्या व्यवहारांचे सर्व नियम लागू होतील. त्यामुळे आपलं खातं फ्रीज व्हायला नको असेल, तर आपलं KYC अद्ययावत आहे ना, याची खात्री करून घ्या आणि ते नसल्यास करुन घ्या.