`हिंदू-मुस्लिम खातात बीफ, बंदी शक्य नाही`
त्रिपुरामध्ये भाजपला सत्तेची कवाडं उघडी करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते तसचं प्रदेश प्रभारी सुनील देवधर यांनी बीफ बंदीवर भाष्य केलंय.
नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये भाजपला सत्तेची कवाडं उघडी करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते तसचं प्रदेश प्रभारी सुनील देवधर यांनी बीफ बंदीवर भाष्य केलंय.
भाजप सरकारची धोरणं स्पष्ट करताना पूर्वेत्तर राज्यांत बहुसंख्य लोक बीफ खातात... मग ते मुस्लिम असो, ख्रिश्चन असो किंवा हिंदू... त्यामुळे इथं बीफवर बंदी शक्य नाही, असं देवधर यांनी स्पष्ट केलंय.
एखाद्या राज्यातील बहुसंख्य लोकांना वाटत असेल तर तिथलं सरकार बीफवर बंदी आणू शकेल. नॉर्थ-इस्टच्या राज्यांतील बहुसंख्य लोक बीफ खात असतील, तर स्थानिक सरकार त्यावर बंदी आणणार नाही, अशी पुश्तीही त्यांनी जोडलीय.
त्रिपुरामध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर, उत्तर भारतातील राज्यांप्रमाणे भाजप त्रिपुरामध्येही बीफवर बंदी आणणार का? असा साहजिकच प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर देवधर यांनी हे स्पष्टिकरण दिलंय.