कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या निवडणुक निकालांकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले आहे. भाजपने प्रचंड शक्तीने केलेला प्रचार आणि ममता बॅनर्जी यांचा प्रादेशिक वादाचा झंझावात यांमध्ये ममता बॅनर्जी सरस झाल्याचे चित्र आहे. पश्चिम बंगालमध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये टीएमसीला 200 जागांवर आघाडी मिळाली आहे तर, भाजपला 86 जागांवर आघाडी मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकेकाळी डाव्या पक्षांचा गड ओळखल्या जाणाऱ्या बंगालमध्ये तृणमुल कॉंग्रेसने सत्ता स्थापन केली. ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात डाव्यांचा राजकीय प्रभाव कमी होत गेला. आता टीएमसीला भाजपचे आव्हान होते. 


विधानसभेच्या 292 जागांपैकी टीएमसी 200 जागांवर आघाडीवर असल्याने टीएमसीच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्याप्रमाणे भाजपला गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 34 जागा मिळाल्या होत्या. आता भाजपची 80 पेक्षा जास्त जागांवर आघाडी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्यातरी ममता बॅनर्जी स्पष्ट बहुमत मिळवतील अशी शक्यता आहे.