लखनऊ : Income Tax Raid on Piyush Jain Home : कानपूरचे परफ्यूम व्यावसायिक पीयूष जैन यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. आता इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या भोवतीचे फास अधिक घट केले आहेत. आयकरच्या तपास पथकाने धाड टाकत कोट्यवधी रुपयांची रोकड ताब्यात घेतली आहे. आता त्यांच्या घरातून 197 कोटींची रक्कमही जप्त करण्याची शक्यता आहे. याशिवाय त्यांना मोठा दंडही भरावा लागू शकतो. आत्तापर्यंत डीजीजीआय अहमदाबाद आणि डीआरआय लखनऊचे पथक पीयूष जैनची चौकशी करत आहे. त्यामुळे या चौकशीत काय माहिती पुढे येते याची उत्सुकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीजीजीआयने यापूर्वी परफ्यूम व्यापारी पियुष जैन यांच्या घरावर छापा टाकला होता आणि त्यांच्या कानपूरमधील आनंदपुरी घरातून आणि कन्नोजच्या कोठीतून 197 कोटी रुपयांच्या रोख नोटा जप्त केल्या होत्या. त्याच्या कन्नौज येथील घरातूनही सोने जप्त करण्यात आले आहे. लखनऊच्या डीआरआय पथकाने जप्त केलेल्या 23 किलो सोन्याबाबत पीयूष जैन यांच्याविरुद्ध स्वतंत्र तपास सुरु केला होता.


आयकरच्या तपास शाखेचे संचालक विजय सिंह यांनी डीजीजीआय अहमदाबादकडून नोटांच्या वसुलीचा संपूर्ण माहिती घेतली आणि त्यानंतर ते आयकर कायदा 1961 अंतर्गत कानपूरच्या विशेष सीजीएम स्नेहा कुमारी यांच्याकडे चौकशी परवानगी मागितली आहे. त्यानंतर पीयूष जैन हे आजही जेलमध्ये आहेत.


विशेष CGM ने इन्कम टॅक्स अधिकारी तपास पथकाला पीयूष जैन यांची जेलमध्ये चौकशी करण्याची परवानगी दिली. यानंतर, इन्कम टॅक्स तपास पथकाचे प्रभारी विजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय पथकाने शनिवारी कानपूर तुरुंगात जाऊन पीयुष जैन यांच्याकडून जप्त केलेल्या रोख रकमेची चौकशी केली.


 एवढ्या मोठ्या रकमेचा स्रोत सिद्ध न केल्याने ही रक्कम आता पीयूष जैन यांना अडचणीत आणणीरी ठरली आहे.  अशा परिस्थितीत आयकर त्याचे हे पैसे जप्त करेल. उलट एवढी मोठी रक्कम आणि सोन्याच्या वसुलीवर त्याला दंडही वेगळा भरावा लागू शकतो.