मुंबई : तुम्ही ITR File करण्यासाठी अजूनही आळस केला असेल तर तुमच्या हातून वेळ गेली नाही. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. ITR भरण्यासाठी शेवटची तारीख 31 जुलै देण्यात आली आहे. तुम्ही जर अजूनही ITR भरला नसेल तर आजच भरा. नाहीतर नंतर दंड भरावा लागू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ITR कसा भरायचा 
1. आयकर विभागाच्या वेबसाइटवर जा.
2. तुमची क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा.
3. तुम्ही लॉग इन केले नसेल तर  'रजिस्टर युवरसेल्फ' बटणावर क्लिक करा.
4. ई-फाइल, इन्कम टॅक्स रिटर्नवर 'फाइल इन्कम टॅक्स रिटर्न' वर क्लिक करा.
5. सर्व माहिती अपडेट करा आणि आयटी रिटर्न भरण्याचे कारण निवडा.
6. आर्थिक वर्ष निवडा.
7. एकदा सर्व माहिती तपासा.
8. सर्वकाही बरोबर असल्यास, 'प्रीव्ह्यू आणि सबमिट करा' वर क्लिक करा.
9. आता ITR अपलोड होईल आणि तुम्हाला OTP मिळेल, तो सबमिट करा.
10. आता तुम्हाला ITR फाईलचा मेसेज येईल.


ITR भरण्याचे फायदे
1. बँका आणि कर्ज देणाऱ्या कंपन्या ITR पावती सर्वात विश्वासार्ह मानतात, ज्यामुळे तुम्हाला कर्ज घेणं सोपं होतं.
2. तुमचे उत्पन्न आयकराच्या कक्षेत येत नसले तरीही, TDS कापला जातो. अशा परिस्थितीत तुम्हाला आयटीआर दाखल करून परतावा मिळू शकतो.
3. एखाद्या देशाला व्हिसा देताना, आयटीआर पावत्या तुमच्या उत्पन्नाचा पुरावा असतात, ज्यामुळे व्हिसा मिळणे सोपे होते.
4. तुम्ही आयटीआरची प्रत उत्पन्न आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी देऊ शकता.