नवी दिल्ली - देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष अर्थात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बसप, तृणमूल काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या इन्कम टॅक्स रिटर्नचे विश्लेषण 'द असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स'ने केले आहे. यातून वेगवेगळ्या स्वरुपाची माहिती पुढे आली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे हे रिटर्न असून, प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला किती उत्पन्न मिळाले आणि त्यापैकी किती खर्च करण्यात आले, याची सविस्तर माहिती रिटर्नमध्ये देण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या एकमेव पक्षाने आर्थिक वर्षात उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला आहे. त्याबद्दलही माहिती रिटर्नमध्ये देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१७-१८ या आर्थिक वर्षात भाजपला १०२७.३३९  कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यापैकी ७४ टक्के रक्कम म्हणजे ७५८.४७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. 


याच आर्थिक वर्षात बसपचे एकूण उत्पन्न होते ५१.६९४ कोटी रुपये आणि त्यापैकी केवळ २९ टक्के रक्कम म्हणजे १४.७८ कोटी रुपयेच खर्च करण्यात आले.


राष्ट्रवादी काँग्रेसने २०१७-१८ या आर्थिक वर्षात ८.१५ कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले आणि उत्पन्नापेक्षा जास्त म्हणजे ८.८४ कोटी रुपये खर्च केले.


२०१६-१७ आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ मध्ये भाजपचे उत्पन्न ०.६७ टक्क्यांनी कमी झाले.


याच प्रमाणे बसपचेही उत्पन्न २०१६-१७ आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ मध्ये २३५.७८ टक्क्यांनी कमी झाले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्पन्न १११.४७ टक्क्यांनी कमी झाले.


एकूण सहा राष्ट्रीय राजकीय पक्षांनी २०१७-१८ मध्ये एकूण ८६.९१ टक्के उत्पन्न स्वेच्छेने दिलेल्या देणग्यांमधून मिळवले. 


२०१७-१८मध्ये केवळ भाजपनेच इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून २१० कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले.


काँग्रेसने अद्याप आपला ऑडिट झालेला ताळेबंद निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केलेला नाही. ताळेबंद सादर करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर २०१८ होती.