ITR भरणाऱ्यांसाठी खुशखबर! 31 जुलैनंतर बसणार नाही दंड?
ITR भरण्यासंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट, पाहा काय सांगतोय हा नियम
मुंबई : तुम्ही अजूनही आयटीआर भरला नसेल तर तुमच्याकडे अवघे 48 तास शिल्लक आहेत. तुम्ही आजपासूनच खटपट करायला लागा. नाहीतर तुम्हाला दंड बसू शकतो. पण सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे की 31 जुलैनंतर आयटीआर फाईल करणाऱ्यांना दंड बसणार नाही. पण हा नियम नक्की कोणासाठी लागू आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
आयकर विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 26 जुलैपर्यंत 3.4 कोटी लोकांनी ITR फाईल केले आहेत. विभागाच्या वतीने ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 देण्यात आली आहे. ही मुदत वाढणार नाही असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
15 जून 2022 पासून सुरू झालेली ITR दाखल करण्याची प्रक्रिया आणखी दोन दिवस (31 जुलैपर्यंत) सुरू राहणार आहे. तुम्ही अजूनही आयकर रिटर्न भरला नसेल तर आजच ऑनलाईन साईटवर जाऊन भरू शकता.
दंडातून कोणाला मिळणार सूट
31 जुलैपूर्वी आयटीआर फाईल करण्यासाठी ऑनलाईन साईटची मदत घेत आहेत. त्यामुळे साईटवर लोड आला असून सर्व्हर डाऊन किंवा लोड होण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही आयकर वेळेआधी पूर्ण भरणं गरजेचं आहे.
इनकम टॅक्स तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कलम 234F अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीचे आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न मूळ सूट मर्यादेपेक्षा जास्त नसेल, तर ITR उशीरा भरण्यात काही फरक नाही. म्हणजेच एखाद्याचं उत्पन्न 2021-22 पर्यंत तुमचे एकूण उत्पन्न 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला 31 जुलैनंतर आयकर भरण्यासाठी कोणताही दंड भरावा लागणार नाही. तुमच्या वतीने दाखल करण्यात येणार्या ITR ला शून्य (0) ITR म्हटले जाईल.
60 वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांना 2.5 लाख रुपयांपर्यंत सूट आहे. 80 वर्षांहून अधिक वयवर्ष असणाऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत सूट आहे. तर बेसिक सूट 5 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे या कॅटेगरीव्यतिरीक्त तुम्ही येत असाल तर तुम्हाला 1000 रुपयांपासून ते 10 हजारांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.