नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी या धोकादायक विषाणूवर मात करणाऱ्यांची संख्या आहे. परंतु राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीत १ हजार ३०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.  १ हजार २२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत आतापर्यंत एकुण १ लाख ४५ हजार ४२७ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १ लाख ३० हजार ५८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ४ हजार १११ रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे. सध्या राजधानी दिल्लीमध्ये १० हजार ७२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 


दिल्लीत कोरोना रुग्णांची वर्तमान स्थिती
कोरोना संक्रमनाचा दर - ५.४६ टक्के
रिकवरी रेट - ८९.८ टक्के
कोरोना रुग्णांचा दर - ७.३७ टक्के 
कोरोना मृत्यू दर - २.८२ टक्के 
कोरोनाचे एक्टिव केस - १० हजार ७२९
होम आयसोलेशन रुग्ण - ५ हजार ४६२
गेल्या २४ तासांमध्ये केलेल्या चाचण्या - ३ हजार ७८७
दिल्लीत आतापर्यंत ११ लाख ९२ लाख ८२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. 


दरम्यान महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख १५ हजार ३३२ इतकी झाली आहे. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ५५८ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 


राज्यात एकूण १७ हजार ७५७ जणांचा बळी गेला असून महाराष्ट्रातील मृत्यूदर ३.४५ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 10,00,588 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ३४,९५७ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.